दैव बलवत्तर म्हणून महिला बचावली – ट्रकने काढला पळ – आमदार प्रेमेंद्र शेट यांनी जखमी महिलेला वाचविण्यासाठी केले प्रयत्न – अपघातांची मालिका सुरूच
डिचोली / प्रतिनिधी
डिचोली तालुक्यात गेल्या आठ दिवसांमध्ये भीषण अपघातांमुळे सहा जणांचे बळी जाण्याची घटना घडली असतानाच सुपाचीपुड हरवळे येथील अपघाताची पुनरावृत्ती करणारा अपघात काल गुरू. दि. 16 फेब्रु. रोजी दत्तवाडी साखळीत घडता. केवळ दैव बलवत्तर म्हणून एका दाम्पत्याचे प्राण वाचले. एका दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकने दुचाकीला धडक दिली. हि धडक मागच्या चाकाची लागल्याने दुचाकी व त्यावरील दाम्पत्य रस्त्यावर पडले. हिच धडक जर पुढील चाकाने बसली असती तर मोठा अनर्थ घडला असता. हा अपघात करून ट्रकने मात्र घटनास्थळाहून पळ काढला.
दरम्यान या अपघातग्रस्त दुचाकीच्या मागेच आपल्या कारने होंडाच्या दिशेने एकि लग्नसोहळ्यासाठी जाण्राया आमदार प्रेमेंद्र शेट यांनी घटनास्थळी थांबून सदर जखमी व बेशुद्धावस्थेतील महिलेला शुध्दीवर आणण्यासाठी प्रथमोपचार केले. तर 108 ऊग्णवाहिका येऊन त्यातून त्या महिलेला इस्पितळात नेईपर्यंत आमदार शेट घटनास्थळीच थांबले. उपलब्ध माहितीनुसार काल गुरू. दि. 16 फेब्रु. रोजी दु. 12.45 वा. च्या सुमारास सदर अपघात घडला. आपल्या दुचाकीवरून साखळीहून होंडाच्या दिशेने जाण्राया एका दाम्पत्याला ओव्हरटेक करण्याच्या नादात एका अज्ञात ट्रकने त्यांना धडक दिली. सदर धडक मागच्या चाकीची बसताच दोघेहीजण रस्त्यावर कोसळले. या दांम्पत्यातील पुरूषाला किरकोळ जखम झाली, तर महिलेला मुका मार बसल्याने ती बेशुद्ध झाली.
आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दाखवली जखमी महिलेसाठी तत्परता
याचवेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट हे होंडा येथे एका लग्नसोहळ्यासाठी जात होते. त्याच्या डोळ्यासमोरच सदर अपघात घडला आणि महिला बेशुद्ध झाल्याचे पाहताच त्यांनी आपली गाडी थांबवून ते खाली उतरले. या महिलेला इतरांच्या सहाय्याने उचलून बाजूला आणण्यात त्यानी हातभार लावला. महिला बेशुद्ध असल्याने तिची दातखिळी बसली होती. आमदारांनी आपल्या गाडीतील पाणी आणि चमचा आणून तिचे जबरदस्तीने तोंड उघडून तिला पाणी पाजले. तसेच तिला शुद्धीवर आणण्यासाठी प्राथमिक उपचार केले. त्यामुळे सदर महिला किंचितशी शुध्दीवरही आली.
या दरम्यान त्यांनी 108 रूग्णवाहिकेला संपर्क साधला. साखळीतील रूग्णवाहिका अन्यत्र गेल्याने होंडा येथून रूग्णवाहिका मागवावी लागली. त्यामुळे काहीचा विलंब लागला. रूग्णवाहिका दाखल होताच सदर महिलेला पुन्हा रूग्णवाहिकेत उचलून घालण्यासाठीही आमदार शेट यांनी हात घातला. रूग्णवाहिका घटनास्थळाहून जाईपर्यंत ते तेथेच राहिले आणि मगच लग्नसोहळ्यासाठी निघून गेले.
आमदारांच्या या सेवाकार्याबध्दल घटनास्थळी जमलेल्या लोकांनी त्यांचे कौतुक केले. आमदार प्रेमेंद्र शेट हे पाय जमिनीवर आणि जनतेप्रती आपले कर्तव्य हातावर घेऊन फिरणारेऔ आमदार असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांकडून व्यक्त केल्या गेल्या.