प्रतिनिधी /खानापूर
खानापूरहून कापोलीला जाणारी केएसआरटीसीची बस के. ए. 22-एफ-2161 हलसालजवळ समोरुन येणाऱया दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी चालकाने रस्त्याच्या कडेला घेतल्याने चिखलातून बस बाजूला सरकल्याने गटारीत अडकली. चालकाने सावधगिरी बाळगून बस थांबविली. मात्र बाजूला लहान गटार असल्याने गटारीत बसचे समोरील चाक गेल्याने ती तशीच अडकून राहिली. सुदैवाने बसमधील कोणालाही दुखापत झाली नाही. काही वेळेनंतर क्रेनच्या साहाय्याने बस बाजूला काढण्यात आली.