तसे पाहिल्यास मद्य, बियर आणि व्हिस्कीला आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते, परंतु याच्या चाहत्यांसाठी याहून अधिक मूल्यवान कुठलीच गोष्ट नसावी. काही लोक असेही आहेत, ज्यांना वेगवेगळय़ा प्रकारच्या मद्याचे संकलन करण्याचा छंद असतो आणि यासाठी ती वाटेल ती किंमत मोजण्यास तयार असतात. याचेच एक उदाहरण अलिकडेच दिसून आले आहे. एक दुर्लभ स्कॉच व्हिस्कीच्या एका कास्कला (पीपे) एका वैयक्तिक संकलकाने 20 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केले आहे. हा संकलक आशियातील असून त्याने या खरेदीद्वारे एक नवा विश्वविक्रमच केला आहे. एकल माल्ट नोव्हेंबर 1975 मधील असून त्याने एप्रिलमध्ये 1.2 दशलक्ष डॉलर्समध्ये विकले गेलेल्या एका व्हिस्कीचा विक्रम मोडीत काढला आहे.
अर्दबेग ओनर आणि ग्लेनमोरंगी या एलव्हीएमएच लक्झरी गुड्स ग्रूपची सहाय्यक कंपनी आहेत. या कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस मोरादपोर यांनी विक्रम मोडीत काढणारी ही व्हिस्की स्थानिक समुदायासाठी गर्वाचा स्रोत होती असे म्हटले आहे. इस्ले येथील लोकांनी डिस्टिलरी विलुप्त होण्याच्या वाटेवरून पुन्हा स्थिरसावर होताना जगातील सर्वात अधिक मागणी असणाऱया व्हिस्कीची निर्मिती पाहिली असल्याचे ते म्हणाले.
कास्क नंबर 3
कास्क नंबर 3 म्हणून प्रसिद्ध या व्हिस्कीचे उत्पादन 207 वर्षांपूर्वी स्कॉटिश बेट इस्लेवर अर्दबेग डिस्टिलरीमध्ये करण्यात आले होते. डिस्टिलरीच्या तुलनेत दुपटीहून अधिक दरात याची विक्री करण्यात आली होती आणि याचा पूर्ण स्टॉक 1997 मध्ये खरेदी करण्यात आला होता. डिस्टिलरी पुढील 5 वर्षांपमध्ये प्रत्येक पीपेमधून व्हिस्कीच्या सुमारे 88 बॉटल्स तयार करणार आहे. या प्रत्येक बॉटलची किंमत सुमारे 43 हजार डॉलर्स आहे.
भावनिक आनंद देणारा स्वाद
मी माझ्या कारकीर्दीत केवळ दोन किंवा तीनवेळा अशाप्रकारच्या व्हिस्कीचा स्वाद घेतला आहे. यात एक भावनात्मक आनंद देणारा गुण असून तो शब्दांमध्ये व्यक्त करणे माझ्यासाठी अत्यंत अवघड असल्याचे उद्गार अर्दबेगमधील डिस्टिलिंग आणि व्हिस्की निर्मितीचे प्रमुख बिल लम्सडेन यांनी काढले आहेत.