Tarun Bharat

इंग्लंडकडून हॉलंडचा वनडे मालिकेत व्हाईटवॉश

वृत्तसंस्था /ऍमस्टलव्हीन  (हॉलंड)

इंग्लंडच्या क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान हॉलंडचा (नेंदरलँडस्) 3-0 अशा फरकाने एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील बुधवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने हॉलंडचा 8 गडय़ांनी पराभव केला.

Advertisements

या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून हॉलंडला प्रथम फलंदाजी  दिली. हॉलंडने 50 षटकांत सर्वबाद 244 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 30.1 षटकांत 2 बाद 245 धावा जमवित विजय नोंदविला. इंग्लंडतर्फे जेसन रॉय आणि बटलर यांनी दमदार फलंदाजी करताना अनुक्रमे नाबाद 101 आणि नाबाद 86 धावा झळकविल्या.

या सामन्यात हॉलंडच्या डावामध्ये पाचव्या षटकांत त्यांचा सलामीचा फलंदाज विक्रमजीत सिंग बाद झाला. हॉलंड संघातील कुपरने 37 चेंडूत 33 धावा जमविल्या. 18 व्या षटकांत हॉलंडने 2 बाद 88 धावा जमविल्या होत्या. मॅक्स ओ दाऊदने 69 चेंडूत अर्धशतक झळकविले. तो डावातील 25 व्या षटकांत बाद झाला. डिलेडी आणि कर्णधार एडवर्ड्सने या जोडीने चौथ्या गडय़ासाठी 84 धावांची भागिदारी केली. डिलेडीने 78 चेंडूत 56 धावा जमविल्या. तो 40 व्या षटकांत बाद झाला. हॉलंडचे तळाचे फलंदाज लवकर बाद झाले. इंग्लंडतर्फे डेव्हिड विलीने 36 धावांत 4 गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या रॉय आणि सॉल्ट या सलामीच्या जोडीने 9 षटकांत 81 धावा झोडपल्या. सॉल्ट 49 धावांवर बाद झाला. त्यानंतर डेव्हिड मलान खाते उघडण्यापूर्वी तंबूत परतला.

बटलर आणि रॉय या जोडीने दमदार फलंदाजी करत आपल्या संघाला 8 गडय़ांनी विजय मिळवून दिला. जेसन रॉयने नाबाद 101 तर बटलरने नाबाद 86 धावा झळकविल्या.

संक्षिप्त धावफलक : हॉलंड 50 षटकांत सर्वबाद 244 (एडवर्ड्स 64, डिलेडी 56, डेव्हिड विली 4-36), इंग्लंड 30.1 षटकांत 2 बाद 245 (जेसन रॉय नाबाद 101, बटलर नाबाद 86, मिकेरिन 2-59)

Related Stories

शेख झाएदचे क्युरेटर मोहन सिंग कालवश

Patil_p

आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांना मुदतवाढ शक्य,

Patil_p

सर्वोत्तम फुटबॉलपटूंच्या यादीमध्ये लिव्हरपूलचे वर्चस्व

Patil_p

सौरभ गांगुलींना हृदयविकाराचा ‘सौम्य’ झटका

Patil_p

स्पेनचा टेनिसपटू पेरेझवर आठ वर्षांची बंदी

Patil_p

देवेंद्र झाझरियाला ‘पद्मभूषण’, अवनी, कटारियाला ‘पद्मश्री’

Patil_p
error: Content is protected !!