Tarun Bharat

अंडर आर्म्सचा काळपटपणा घालवायचा असेल तर…हे उपाय करून बघा

अंडर आर्मची त्वचा काळी पडल्यानं बहुतांश महिला स्लीव्हलेस कपडे परिधान करणं टाळतात. या समस्येमुळे कित्येक महिलांसाठी स्टायलिश कपडे परिधान करणे गैरसोयीचे जाते. काळवंडलेल्या अंडर आर्म्सपासून तुम्हाला देखील सुटका हवी आहे का? काळवंडलेल्या अंडर आर्मपासून सुटका मिळवण्यासाठी सोप्या घरगुती उपचारांची मदत घ्या. यासाठी तुम्हाला अधिक कष्ट करण्याचीही आवश्यकता नाही. अंडर आर्मची त्वचा उजळण्यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये भरपूर प्रमाणात उपयुक्त सामग्री मिळतील. सोप्या घरगुती टीप्समुळे काखेतील काळेपणा दूर होईल. पण लक्षात ठेवा काखेतील त्वचा संवेदनशील असते, त्यामुळे घरगुती उपाय करतानाही त्वचेचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

वॅक्सिंग
रेझरनं काखेतील केस काढल्यास तेथील त्वचा काळी पडते. रेझरऐवजी व्हॅक्सिंगचा पर्याय स्वीकारावा.
डार्क underarms चं मुख्य कारण म्हणजे शेव्हिंग. खूप लवकर लवकर शेव्हिंग केल्यास, केसांची वाढ एकसारखी होत नाही. त्यामुळे संवदेनशील त्वचा खराब होते आणि त्याठिकाणी काळी पडते. यापासून वाचण्यासाठी तुम्ही वॅक्सिंग हा चांगला पर्याय निवडू शकता. शेव्हिंगच्या तुलनेत या प्रक्रियेत कमी त्रास होतो. तसंच हे केसांना मुळापासून काढून टाकतं.

दुध आणि हळद
अंडर आर्मची त्वचा उजळण्यासाठी तुम्ही दूध आणि हळदीचा वापर करू शकता. दुधामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असते. ज्यामुळे अंडरआर्मचा काळेपणा दूर होण्यास मदत मिळते.

कोरफड
कोरफडीचा सुद्धा फायदा होतो.कोरफडीचा गर काढून त्याची पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट १० ते १५ मिनिटांसाठी अंडर आर्मवर लावून ठेवा.

बदाम तेल
बदाम तेलाचे काही थेंब घेऊन अंडर आर्मचा हलक्या हातानं मसाज करा.बदामाच्या तेलामध्ये फायटोकेमिकल चे गुण आहेत. यामुळे काखेचा काळेपणा दूर होण्यास मदत मिळते

बेकिंग सोडा
काळपटपणां हटवण्यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट अंडरआर्म्सवर लावा. वाळल्यावर अंडरआर्म्स चोळून स्वच्छ करा.

नारळ तेल
नारळाच्या तेलात व्हिटॅमिन इ आढळतं. हे रंग स्वच्छ करण्यात तसेच नैसर्गिक डिओडरेंटचे काम करतं. कोकोनट ऑयलने अंडरआर्म्सची मालीश करून 10 ते 15 मिनिट तसेच राहू द्या. नंतर हलक्या साबण वापरून धुऊन टाका

काकडी
काकडीच्या वापरामुळे आपल्या त्वचेला थंडावा मिळतो. यामध्ये नैसर्गिक स्वरुपात ब्लीचिंग एजेंट असतात. हे घटक अंडरआर्म्सचा काळपटपणा कमी करण्यास मदत करतात.

Related Stories

वजननियंत्रणासाठी आसने

tarunbharat

हनुमानासन

Omkar B

समस्या स्ट्रेचमार्कस्ची

Omkar B

वारंवार तोंडात अल्सर येताहेत? मग हे घरगुती उपाय करुन बघा

Tousif Mujawar

बालायाम

Omkar B

कॅव्हिड मुक्तीनंतरची चिंता

Amit Kulkarni