ऑनलाईन टीम/तरुण भारत
WHO आणि आयुष विभाग पारंपारिक औषधांवरील संशोधनासाठी जगातील पहिले जागतिक केंद्र गुजरातमधील जामनगर येथे उभारणार आहे. यासाठी आयुष विभाग आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यात 25 मार्च रोजी जिनिव्हा येथे करार करण्यात आला आहे. या योजनेसाठी 250 दशलक्ष डॉलर खर्च केले जाणार आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक पारंपारिक औषध केंद्राची स्थापना करण्यासाठी भारत सरकारसोबत करार केला आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये या केंद्राची स्थापना करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून याबाबत सांगितले आहे. मोदी म्हणाले की, ‘भारतातील पारंपारिक औषध आणि चांगल्या आरोग्य पद्धती जगभरात खूप लोकप्रिय होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे सेंटर आपल्या समाजातील आरोग्य सुधारण्याच्या वाढीसाठी खूप मदत करेल.’ ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनची स्थापनेच्या करारावर स्वित्झर्लंडच्या जिनेव्हामध्ये भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेमधील करारावर स्वाक्षरी झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालकांनी पाचव्या आयुर्वेद दिवसानिमित्ताने १३ नोव्हेंबर २०२० रोजी घोषणा केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपारिक औषधी केंद्राची स्थापना करण्याची ९ मार्चला मंजूरी दिली होती.