Tarun Bharat

रस्त्यावरचा शिवसैनिक! संजय पवार आहेत तरी कोण?….

Advertisements

कोल्हापूर: शिवसेनेच्या राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारावरून बऱ्याच घडामोडी घडत आहेत. संभाजीराजे यांनी शिवबंधन नाकारल्यानंतर कोल्हापुरातील कट्टर शिवसैनिकांना शिवसेनेने संधी दिल्याचे समोर आले आहे. शिवसेनेकडून कोल्हापुरातील कट्टर शिवसैनिक संजय पवार यांचे नाव निश्चित झाल्याचे समोर येत आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र हे संजय पवार आहेत तरी कोण हे आपण जाणून घेऊया…

कोण आहेत संजय पवार?

संजय पवार हे कोल्हापुरातील शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात मागील जवळपास 25 ते 30 वर्षे त्यांनी शिवसेनेत काम केले आहे ते सध्या कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहतात ते मूळ ग्रामीण भागातील असून ग्रामीण भागातील उमेदवाराला राज्यसभेवर पाठवण्याचे नियोजन शिवसेनेने केले असल्याचे समोर येत आहे संभाजीराजे छत्रपती यांना शह देण्यासाठी तसेच ग्रामीण भागासह शहरी भागात शिवसेनेचा संपर्क वाढवण्यासाठी शिवसेनेला बाळा हवे आहे त्या दृष्टिकोनातूनच शिवसैनिकाला संधी देण्याचा विचार शिवसेनेचा आहे

संजय पवार यांची राजकीय कारकीर्द

संजय पवार हे शिवसेनेचे कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. सन १९८९ सालापासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेत ते तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. १९९०, १९९५ आणि २००५ साली ते नगरसेवक पदावर राहिले आहेत. तर २००५ साली ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेता म्हणून राहिले आहेत. तसेच शिवसेना करवीर तालुका प्रमुख, शिवसेना कोल्हापूर शहर प्रमुख आणि २००८ पासून शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत आहेत. तसेच २००८ ते २०२० पर्यंत आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या पदावर कार्यरत होते.

Related Stories

महाराष्ट्रात 35 हजार रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी नगराध्यक्षांनी नगरविकास विभागाकडे मागवले मार्गदर्शन

Archana Banage

जयंत पाटलांच्या दौऱयामुळे कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह

NIKHIL_N

चिक्कबळ्ळापूर उत्खनन स्फोटातील मुख्य आरोपीला अटक

Archana Banage

मातीचा भराव रस्त्यावर आल्याने परशुराम घाट ठप्प!

Patil_p

शिकाऱ्याच्या जाळ्यातून तरसाची सुटका करण्यात वनविभागाला यश

datta jadhav
error: Content is protected !!