सियामकडून आकडेवारी सादर
नवी दिल्ली
भारतामधील 32 दशलक्ष मध्यम वर्गातील लोकसंख्येवर जगभरातील कंपन्यांचे लक्ष आहे. यामध्ये कार कंपन्याही मागे नाहीत. यामध्ये सर्वसामान्यांसाठी कार निर्मिती करणाऱया कंपन्यांमध्ये मारुती सुझुकीसह मर्सिडीज बेंझ व लँबोर्गिनी यासारख्या लक्झरी कार निर्मिती करणाऱया कंपन्याही सक्रीय आहेत.
मोटार वाहन निर्मिती करणाऱया कंपन्यांची संघटना सियाम (एसआयएएम) यांनी नुकतेच एप्रिल महिन्यात मोटार वाहनांच्या विक्रीचा आकडा सादर केला आहे. यामध्ये एक महिन्यात सर्वात जास्त कार विक्रीचे ध्येय हे मारुती सुझुकीने प्राप्त केले असून दुसऱया स्थानी याच महिन्यात दक्षिण कोरियन कार निर्मिती करणारी कंपनी हय़ुंडाई राहिली आहे. तिसऱया नंबरवर टाटा मोर्ट्स राहिल्याची माहिती सियामने दिली आहे.
एप्रिलमधील वाहन व्रिक्री
चालू वर्षातील एप्रिल महिन्यात सर्व कंपन्यांची मिळून एकूण कार विक्री ही 2,51,581 वर राहिली आहे. तर हाच आकडा मागील वर्षाच्या तुलनेत अधिक राहल्याची नोंद आहे.