Tarun Bharat

वायव्य शिक्षक-पदवीधर आमदार कोण?

आज फैसला : नागरिकांमध्ये उत्सुकता : ज्योती कॉलेजमध्ये होणार मतमोजणी

प्रतिनिधी/बेळगाव

वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मोठय़ा चुरशीने पार पडली आहे. बुधवार दि. 15 रोजी मतमोजणी होणार असून वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे आमदार कोण बनणार? हे कळणार आहे. याचबरोबर पश्चिम शिक्षक मतदारसंघाची मतमोजणीदेखील ज्योती कॉलेज येथेच होणार आहे. या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वायव्य शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक मोठय़ा चुरशीने पार पडली. शिक्षक मतदारसंघासाठी 12 तर पदवीधर मतदारसंघासाठी 11 जण रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस, निजद यासह अपक्षांनीही ही निवडणूक लढविली आहे. काही अपक्षांनी कडवी झुंज दिली आहे. त्यामुळे विजयी कोण होणार? याकडे साऱयांचेच लक्ष लागले आहे.

गुरुवारी सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. प्रारंभी सर्व मतपत्रिका एकत्र करून गठ्ठे बांधण्यात येणार आहेत. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली असून शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी स्वतंत्र खोल्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास हे नजर ठेवून असणार आहेत.

कोरोनाचे सर्व नियम पाळत ही मतमोजणी होणार आहे. पार्किंगची सोय सीपीएड मैदानावर करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवार तसेच एजंट व समर्थकांना त्या ठिकाणीच सर्व वाहने पार्किंग करावी लागणार आहेत.

Related Stories

लोककल्पतर्फे चिखले येथे नेत्र चिकित्सा शिबिर

Amit Kulkarni

महामार्गावरील चोरटय़ांचा बंदोबस्त करा

Amit Kulkarni

बेळगाव जिल्ह्याचा दहावीचा निकाल 85.85 टक्के

Amit Kulkarni

हरिप्रिया एक्स्प्रेस धावली इलेक्ट्रिक इंजिनवर

Amit Kulkarni

दुसऱया दिवशीही विमानसेवेला बसला फटका

Amit Kulkarni

स्वच्छता कामगारांना मास्कचे वितरण

Patil_p
error: Content is protected !!