Tarun Bharat

सोशल मीडियावर ट्रेंड होणारे शहाजी पाटील कोण? जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास…

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

“काय ती झाडी…काय ते डोंगार…काय ती हाटील एकदम ओकेच…” असं फोनवर बोलणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांचा कॉल रेकॉर्ड सोशल मीडियावर धुरळा उडवत आहे. पाटील यांच्या या ऑडिओ क्लिपमधील संभाषणावर मीम्सचा पाऊसही पडत आहे.

कोण आहेत शहाजी पाटील?

शहाजी पाटील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. सांगोला हा ग्रामीण भाग असल्याने शहाजी पाटील यांची बोलीभाषाही ग्रामीण पद्धतीचीच आहे. कॉलेज जीवनापासूनच वक्तृत्त्वावर पकड असल्याने पाटील यांच्या सभांना मोठी गर्दी होत असते. आजपर्यंत त्यांनी दोनवेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे.

काय आहे त्यांची राजकीय कारकीर्द?

विद्यार्थी दशेपासून शहाजी पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. 1985 साली त्यांनी दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 1995 मध्ये पाटील यांनी गणपतराव देशमुख यांचा 192 मतांनी पराभव केला. त्यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 पर्यंतच्या सर्व निवडणुकीत शहाजी पाटील यांचा पराभव झाला. 2019 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2019 ला गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करत पाटील आमदार झाले.

का आले चर्चेत?

शहाजी पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असून, ते सध्या गुवाहाटीत आहेत. गुवाहाटीत असलेल्या याच शहाजी पाटील यांची सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. एका कार्यकर्त्याने काळजीपोटी त्यांना फोन लावला. त्यावेळी कार्यकर्त्याने त्यांना विचारले, साहेब कुठे आहात? तेव्हा पाटील यांनी “काय ती झाडी…काय ते डोंगार…काय ती हाटील एकदम ओकेच…” अशा शब्दात संभाषण संभाषण सुरू केले. त्यांनी गुवाहाटीचं जे वर्णन केलं ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचे मीम्स सुद्धा व्हायरल होत आहेत.

Related Stories

चायनीज व नायलॉन मांजाबाबत जनजागृती

prashant_c

‘आद्य क्रांतिकारकांना’ दीपोत्सवातून अनोखी मानवंदना

Rohan_P

सुगंधी निसर्गोत्सव चैत्रमास

Omkar B

मासिक पाळीच्या काळात ‘ही’ कंपनी महिलांना देणार वर्षभरात दहा सुट्ट्या

Rohan_P

कोरोनाविषयी जनजागृतीसाठी दत्तमंदिराचा पुढाकार

tarunbharat

‘या’ देशात तयार होतोय तब्बल 11 कोटी 23 लाखांचा मास्क

datta jadhav
error: Content is protected !!