Tarun Bharat

मळगाव रेल्वे ब्रीजखाली मृतावस्थेत सापडलेली ती महिला कोण?

Advertisements

मृतदेहाजवळील पर्समधील चिठ्ठीवर मालाड-मुंबई असा आहे पत्ता

सावंतवाडी/प्रतिनिधी-  

मळगाव येथील ब्रिजच्याखाली रेल्वे ट्रॅकवर अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सदर महिला 55 ते 60 वयाची असून रेल्वेला धडकून किंवा तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
                   महिलेच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला असून तिच्याजवळ पर्स सापडली आहे. त्यात दीड हजार रूपये आणि चिठ्ठी आढळली असून त्यावर मालाड-मुंबई अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे. दरम्यान ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे घटनास्थळी दाखल झाले असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
                      संबंधित महिलेच्या अंगावर हिरव्या रंगाची साडी आहे. तर तिचा चेहरा छिन्नविछिन्न झाला आहे. त्यामुळे तिची ओळख पटण्यात अडथळे येत आहे. संबंधित महिला कोणाच्या ओळखीची असल्यास किंवा कोणी बेपत्ता असल्यास सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन शंकर कोरे यांनी केले आहे.

Related Stories

भाषेचे संस्कार हे नेहमीच चिरंतर- रवींद्र मडगावकर

Ganeshprasad Gogate

संकटकाळात नीलेश राणेंचा बंगल्यात बसून आराम!

NIKHIL_N

दुर्गेवाडीत 50 हजाराचा लाकूड साठा जप्त

Patil_p

दापोली पं. स.चे पंचायत राज समितीचीकडून मूल्यमापन

Abhijeet Shinde

गरिबांची भूक भागवणारेच उपाशी!

Patil_p

गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

NIKHIL_N
error: Content is protected !!