Tarun Bharat

माझी पेन्सिल, रबर, मॅगी का महाग झाली?

Advertisements

5 वर्षीय मुलीची पंतप्रधान मोदींना विचारणा, पेन्सिल मागल्यास मारते आई

उत्तरप्रदेशच्या कनौजमध्ये राहणाऱया एका 5 वर्षीय मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना निरागसतेने भरलेले पत्र लिहिले आहे. या पत्रात पंतप्रधानांकडे महागाईसंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. इयत्ता पहिलीत शिकणाऱया या मुलीच्या पत्राला अद्याप पंतप्रधानांकडून उत्तर आलेले नाही.

ही मुलगी छिबरामऊ येथे राहते. “माझे नाव कृति दुबे असून मी इयत्ता पहिलीत शिकतेय. मोदीजी तुम्ही खूपच महागाई केली आहे. माझी पेन्सिल आणि रबर (इरेजर) देखील महाग केले आणि मॅगीची किंमतही वाढविली. आता माझी आई मी पेन्सिल मागितल्यावर मारते, मी काय करू? शाळेतील मुले माझी पेन्सिल चोरतात’’ असे तिने स्वतःच्या पत्रात नमूद केले आहे.

हिंदी भाषेत पत्र

या चिमुरडीने रागावून लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलीचे वडिल विशाल दुबे हे पेशाने वकील आहेत. हे पत्र माझ्या मुलीची ‘मन की बात’ आहे. मुलीचे पत्र वाचल्यावर तिच्या भावना पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्याच निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले आहे.

आई म्हणते….

5 वर्षीय कृति नेहमी घरातच खाण्यास नकार देते, तिची मॅगी खाण्याची इच्छा असते. अशा स्थितीत तिची आई मॅगी देण्यास नकार देत सरकारने सर्वकाही महाग केले, आता केवळ जेवण करायचे असे सांगत असते. याचबरोबर दररोज पेन्सिल-खोडरबर शाळेत हरवल्यावर आई तिला महागाईचे निमित्त पुढे करत ओरडत असते. केवळ याचमुळे कृतिने स्वतःच्या वहीत मोदींच्या नावाने एक पत्र लिहिले आहे.

Related Stories

आसाम : 15 जूनपर्यंत वाढविला कोरोना कर्फ्यू!

Rohan_P

कोरोनाला रोखण्यासाठी ‘अश्वगंधा’ प्रभावी

Patil_p

चालू वर्षीच लस आणणार!

Patil_p

देशात 60,753 नवे बाधित

datta jadhav

पतंप्रधान नव्हे भाडय़ाचे गुंड परप्रांतीय

Patil_p

राजीव गांधींच्या एका मारेकऱ्यांची सुटका होणार

Patil_p
error: Content is protected !!