Tarun Bharat

श्रीलंकेत विक्रमसिंघे हंगामी राष्ट्रपती

22 जुलै रोजी नवा राष्ट्रपती निवडणार

कोलंबो / वृत्तसंस्था

श्रीलंकेत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी शुक्रवारी हंगामी राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. श्रीलंकेचे सरन्यायाधीश जयंता जयसूर्या यांनी त्यांना शपथ दिली. 22 जुलैपर्यंत ते राष्ट्रपती असतील. आता शनिवारी संसदेची बैठक होणार असल्याचे अभयवर्धने यांनी सांगितले. नवीन राष्ट्रपतीपदाची निवडणूक 22 जुलै रोजी होणार आहे.

गंभीर आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेला सात दिवसांत नवा राष्ट्रपती मिळणार आहे. संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. देशाबाहेर पलायन केलेल्या गोटाबाया राजपक्षे यांनी गुरुवारी अधिकृतपणे राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे, असे ते म्हणाले. खासदारांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी त्यांनी जनतेला शांततापूर्ण वातावरण राखण्याचे आवाहन केले आहे.

गोटाबाया राजपक्षे सौदीला जाणार ?

श्रीलंकेतून पळून मालदीवमध्ये पोहोचलेले माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आता सिंगापूरला पोहोचले आहेत. त्यांना घेऊन सौदी एअरलाईन्सचे विमान गुरुवारी संध्याकाळी सिंगापूरच्या चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि दोन अंगरक्षक होते. गोटाबाया आपल्या पत्नीसोबत सिंगापूरमधील विमानतळावर खरेदी करतानाचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. दुसरीकडे, गोटाबाया राजपक्षे वैयक्तिक भेटीवर आले आहेत. त्यांनी ना आश्रय मागितला आहे, ना त्यांना आश्रय देण्यात आला आहे, असे सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. आता गोटाबाया सौदी अरेबियाला जाणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे भाऊ आणि माजी मंत्री बासिल राजपक्षे हेही अमेरिकेत पळून गेले आहेत.

लष्कराने राष्ट्रपती भवनातून आंदोलकांना हटवले

श्रीलंकेतील संतप्त जमावाचा सामना करण्याची जबाबदारी लष्कराने घेतली आहे. लष्कराने राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालयासह प्रशासकीय इमारतींमधून जनतेला हटवले आहे. ही दोन्ही ठिकाणे लष्कराने आपल्या ताब्यात घेतली आहेत  जनतेला संसदेत जाण्यापासून रोखण्यासाठी रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. कोलंबोमध्ये अजूनही निदर्शने सुरू आहेत.

Related Stories

चीनने वाढविली मृत्यांची संख्या

Patil_p

इटलीतील ‘शतायू’ गाव

Patil_p

अत्यंत विषारी बेडुक

Patil_p

पाकिस्तानची कोंडी

Patil_p

ब्रेथ ऍनालायजरद्वारे होणार कोरोना चाचणी

Patil_p

होलिका दहनासारखा रशियात मास्लेनित्सा फेस्टिव्हल

Patil_p