Tarun Bharat

लातूरच्या ॲडिशनल सीईओंच्या पत्नीची हॉटेलमध्ये आत्महत्या

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

लातूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव (Prabhu Jadhav) यांच्या पत्नीने सोलापुरातील हॉटेलमध्ये साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. स्नेहलता प्रभू जाधव (Snehlata Jadhav) (वय 45, रा. लातूर) असे त्यांचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहलता जाधव यांच्या मुलाचे 18 डिसेंबर रोजी लग्न आहे. लग्नाच्या बस्त्याच्या खरेदीसाठी स्नेहलता जाधव या आपल्या पतीसोबत कर्नाटकातील चडचण येथे गेल्या होते. शनिवारी (26 नोव्हेंबर) रात्री उशीर झाल्याने ते दोघेही सोलापुरातील सोरेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. रविवारी (27 नोव्हेंबर) सकाळी प्रभू जाधव हे कामानिमित्त लातूरला गेले.

अधिक वाचा : अखेर बाबा रामदेव यांनी मागितली महिलांची माफी; म्हणाले…

दरम्यान, दुपारी स्नेहलता यांनी आपल्या लातूरमधील नातेवाईकाला जोरजोराने रडत फोन केला. फोन करुन त्यांनी आपण आत्महत्या करणार असल्याचे नातेवाईकाला सांगितले. याचवेळी नातेवाईकाने त्यांची समजूत काढत संबंधित प्रकाराची माहिती सोलापुरातील नातेवाईकांना दिली. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी सोलापुरातील नातेवाईक हॉटेलवर दाखल झाले. परंतु, त्यावेळी स्नेहलता थांबलेल्या खोलीचा दरवाजा बंद होता. नातेवाईकांनी दरवाजा उघडला असता त्यांना स्नेहलता या लटकलेल्या अवस्थेत आढळल्या. नातेवाईकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. स्नेहलता यांनी आत्महत्या का केली यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सोलापूर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Related Stories

सोलापूर : अक्कलकोटमध्ये आढळले सहा कोरोना बाधित रुग्ण

Archana Banage

पांढऱ्या बुरशीमुळे महिलेच्या आतड्याला पडले छिद्र!

Tousif Mujawar

बांधकाम मटेरियल तपासणीसाठी अभियंत्याने घेतली ऑनलाईन लाच

Archana Banage

महापुराच्या नावाखाली शिवसेनेची मुंबईत नवी वसुली मोहीम, निलेश राणेंचा गंभीर आरोप

Archana Banage

ऐतिहासिक माणगाव परिषदेचा शताब्दी समारोप मोठ्या उत्साहात पार

Archana Banage

गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाचं नाव ठरलं!, अजेंडाही सांगितला…

datta jadhav