पुणे : शिरुर न्यायालयात पाेटगीच्या केससाठी आलेल्या माजी सैनिकाने पत्नी आणि सासूवर गाेळीबार केल्याची घटना आज सकाळी घडली. गोळीबारात माजी सैनिकाच्या पत्नीचा मृत्यू झाला असून, सासू गंभीर जखमी आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पाेलीसांनी गाेळीबार करणाऱ्या पतीस अटक केली आहे.
दीपक पांडुरंग ढवळे (रा. अंबरनाथ, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. तर मंजुळा रंगनाथ झांबरे (रा.वाडेगव्हाण, ता.पारनेर, अहमदनगर) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या त्याच्या पत्नीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक ढवळे हा शिरुर न्यायालयात पाेटगीच्या केसच्या सुनावणीकरिता मंगळवारी आला हाेता. त्यावेळी त्याच्यासाेबत त्याचा भाऊ संदीप ढवळे हा सुध्दा हाेता. ते दाेघेही अंबरनाथ येथून रिक्षाने शिरुर येथे आले. न्यायालयाच्या परिसरात आल्यानंतर त्याने अचानक त्याच्या जवळील पिस्तूलमधून पत्नी मंजुळा झांबरे आणि सासूवर गाेळीबार केला. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून, सासू गंभीर जखमी आहे. खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर रांजणगाव पाेलिसांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस यांनी आराेपीस शस्त्रासह ताब्यात घेतले आहे. शिरुर पाेलीस अधिक तपास करत आहेत.