Tarun Bharat

मतदान करुन परतताना वड कोसळल्याने पत्नी ठार

Advertisements

पती गंभीर जखमी : शिरोडा येथील दुर्दैवी घटना

प्रतिनिधी /फोंडा

पंचायत निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावून घरी परतणाऱया पती-पत्नीच्या चालत्या दुचाकीवर वडाचे झाड कोसळून झालेल्या दुर्देवी अपघातात पत्नीचा मृत्यू झाला. आदिती व्यंकटेश नाईक (39, बरभाट शिरोडा, सोतोरे) असे तिचे नाव आहे. तर तिचा पती व्यंकटेश घनश्याम नाईक (44) हा जखमी झाला आहे. ही घटना काल मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 वा. शिर तारीवाडा येथे घडली.

  फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तारीवाडा शिरोडा येथील मतदान केंद्रावर मतदान करून आपल्या पॅशन जीए 05 सी 8306 क्रमांकाच्या दुचाकीने घरी परतत असताना ही दुर्देवी घटना घडली. चालत्या वाहनावर अचानक वडाचे झाड कोसळून पाठीमागे बसलेल्या महिलेवर पडले. त्यात ती झाडाखाली अडकून गंभीर जखमी झाली. तेथील ग्रामस्थ मिलींद मामलेकर, राजू नाईक व त्याची पत्नी प्रथम मदतीला धावले. अत्यवस्थ अवस्थेत तिला शिरोडा येथील इस्पिपतळात दाखल करण्यात आले, तोपर्यंत उशिर झाला होता. इस्पितळातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

 तिच्या पतीचा हात फ्रॅक्चर झाला आहे. ग्रामस्थांनी फोंडा अग्निशामक दलाला कळविले. अग्निशामक दलाने ग्रामस्थांच्या सहकार्याने झाडाच्या फांद्या हटवून रस्ता मोकळा केला. याप्रकरणी उपनिरीक्षक सूरज काणकोणकर अधिक तपास करीत आहे.

   मयत आदितीच्या पश्चात पती तसेच 6 व 10 वर्षाची दोन मुले असा परिवार आहे. हे कुटुंब पुर्वी बरभाट-शिरोडा येथे राहत होते. हल्लीच त्यांनी सातोरे-शिरोडा येथे नवीन घर बांधले आहे. तिचा पती वेर्णा येथील औद्यागिक वसाहतीत कामाला आहे. दुर्देवी घटनेमुळे दोघा मुलांचे मातृछत्र हरपले आहे. निवडणूक असल्यामुळे या भागात त्याचे येणे झाले व प्रुर काळाने त्यांच्यावर झडप घातली.

Related Stories

साखळीतील राजकारण सरकारला येणाऱया निवडणुकीत भोवणार

Amit Kulkarni

शौचालय योजनेच्या कागदपत्र सोपस्कारासाठी 15 दिवसांचा अवधी द्यावा

Patil_p

दवर्ली स्वामी समर्थ गडावर दोन गटात तणाव

Amit Kulkarni

पोक्सो गुन्हय़ातीलआरोपीस अटक

Patil_p

संविधाने आपल्याला दिलेले अधिकार समजून घ्यावे

Amit Kulkarni

लाँकडाऊन काळात बेळगावमार्गे गोव्यात एकुऊ 680 वाहनांंतून भाज्यांची वाहतूक.

Omkar B
error: Content is protected !!