Tarun Bharat

रानकुत्र्याचा दुचाकीस्वारावर हल्ला

माडखोल – सांगेली मार्गावर बामणादेवी तिठा येथील घटना

ओटवणे / प्रतिनिधी

जंगलातील पिसाळलेला रानकुत्रा अर्थात कोळसुंदयाने चालत्या मोटारसायकलस्वारावर हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी माडखोल – सांगेली मार्गावर बामणादेवी तिठा येथे घडली. सुदैवाने या हल्ल्यात मोटारसायकलस्वाराला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तसेच पिसाळलेल्या या रानकुत्र्याच्या रुद्रावतारामुळे या मोटारसायकलस्वाराची भितीने गाळण उडाली.


सांगेली खळणेवाडी येथील जयानंद पांडुरंग सावंत आपल्या मोटारसायकलने माडखोल येथील दूध डेअरीला दूध घालून परत येत असताना या कोळसुंदयाने त्यांच्यावर हल्ला केला. या कोळसुंद्याने त्यांच्या रेनकोटच्या पॅन्टचा चावा घेतला. यावेळी त्यांनी स्वतः ला सावरत मोटारसायकल थांबवून बचावासाठी धूम ठोकली.


दरम्यान या कोळसुंद्याने मंगळवारी मध्यरात्री बामणादेवी येथील भर वस्तीतील हरिष लातये यांच्या घरापर्यंत मजल त्यांच्या कुत्र्यांना लक्ष केले होते. मात्र लातये कुटुंबियांनी या कोळसुंद्याला पिटाळून लावले. यापूर्वी चौकुळ येथेही अशाच पिसाळलेल्या कोळसुंदयानी दहा जणांचा चावा घेत जखमी केले होते. या पार्श्वभूमीवर या कोळसुंदयाचा वनखात्याने बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातून होत आहे.

Related Stories

कासार्डेत उड्डाण पुलाच्या भिंतीला तडे

NIKHIL_N

रत्नागिरीत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोघांना अटक

Patil_p

रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळे संसर्गाची भीती

NIKHIL_N

जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करा ;आ.नितेश राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

Anuja Kudatarkar

दोडामार्गात भाजपचे आंदोलन

NIKHIL_N

खेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांसह 6 पॉझिटिव्ह

Patil_p