राधानगरी/प्रतिनिधी
वन्यजीव विभागाने फराळे ता. राधानगरी येथील वनविभागाच्या तपासणी नाक्यावर संशयास्पदरित्या जात असताना एका व्यक्तीवर संशय आला. वनविभागाने त्याला थांबवून चौकशी केली असता तो विनापरवाना घोरपड घेऊन जात असताना त्याला रंगेहात पकडले. रजेनाल हालेस डिसोझा (वय 43 रा. काळमावाडी वसाहत बाचणी, ता. कागल) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता निदानखण येथून ही घोरपड आणल्याचे कबूल केले आहे. वन्यजीव कायद्याअंतर्गत त्याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विभागीय वन अधिकारी विशाल माळी, वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संजय कांबळे, भैरवनाथ यादव, वनरक्षक तेजस्विनी पोवार यांनी ही कारवाई केली