Will file a PIL against the Principal – Rane
सावंतवाडी शहरासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर देत आहेत असे असताना सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या अकार्यक्षमतेमुळे वेळेत कामे होताना दिसत नाहीत . मोती तलावाचा कठडा कोसळला याला सर्वस्वी जबाबदार मुख्याधिकारी जावडेकरच आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात आपण जनहित याचिका दाखल करणार आहे. श्री जावडेकर यांच्यामुळे सावंतवाडी शहराची वाट लागली आहे अशी टीका पत्रकारांशी बोलताना बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी स्पष्ट केले . कोणी किती काही सांगो मोती तलावाचा गाळ जो काढण्यात आला आणि जो कठडा कोसळला याला पूर्णपणे जबाबदार जावडेकरच आहेत . त्यामुळे मला कोणी काही सांगितलं तर मी त्यांच्या विरोधात लढणारच आहे. मोती तलावाचा जो कठडा आता बांधण्यात येत आहे आणि त्याला शासनाचा निधी खर्च घालण्यात येत आहे त्यापेक्षा श्री जावडेकर यांची सखोल चौकशी करून कठडा उभारणीसाठी जावडेकर यांच्या पगारातून पैसे कट करावेत आणि ते घ्यावेत असेही राणे आणि स्पष्ट केले.
सावंतवाडी / प्रतिनिधी