वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान महेंद्रसिंग धोनी भाजपमध्ये येणार आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. नुकतीच त्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. अमित शहांबरोबरचे त्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली. छायाचित्रात तो अमित शहा यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. यावरून दोघांमध्ये जवळीक वाढल्याचे अनुमान राजकीय वर्तुळात काढण्यात येत आहे. अद्याप भाजप किंवा धोनी या दोघांकडूनही त्याच्या भाजपप्रवेशासंबंधी कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. तरीही गरमागरम चर्चा या विषयावर होताना दिसत आहे.