Tarun Bharat

मुंबईचा अर्जुन गोव्याकडून खेळणार?

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा चिरंजीव अर्जुन तेंडुलकर आगामी स्थानिक हंगामात मुंबईऐवजी गोवा संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. अर्जुनने यापूर्वी 2020-21 हंगामात सईद मुश्ताक अली चषक स्पर्धेत हरियाणा व पुदुच्चेरीविरुद्ध मुंबई संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. अर्जुन तेंडुलकरने मुंबई क्रिकेट संघटनेकडून यापूर्वीच एनओसीची मागणी केली असल्याचे वृत्त आहे.

अर्जुन तेंडुलकरने 3 वर्षांपूर्वी यू-19 लंकन संघाविरुद्ध 2 ‘कसोटी’ सामने खेळले असून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचा संभाव्य संघात समावेश होता. मात्र, हंगामात एकही संधी न देता त्याला वगळले जाणे आश्चर्याचे ठरले होते. गोवा क्रिकेट संघटनेने तूर्तास अर्जुनचा संभाव्य संघात समावेश केला जाण्याचे संकेत दिले आहेत.

‘आम्हाला डावखुऱया गोलंदाजाची आणि मध्यफळीत उपयुक्त योगदान देऊ शकणाऱया खेळाडूची आवश्यकता होती आणि त्या अनुषंगाने आम्ही अर्जुनला गोवा संघात दाखल होण्याचे निमंत्रण दिले. आम्ही हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी काही सराव सामने खेळवणार आहोत आणि त्या सामन्यात अर्जुनला संधी दिली जाईल. अर्जुनच्या कामगिरीवर त्यानंतर निर्णय घेतला जाईल’, असे गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सूरज लोटलीकर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना नमूद केले.

आजवरचा इतिहास पाहता, मुंबईतील अव्वल क्रिकेटपटूंच्या सुपुत्राने अन्य राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याची परंपरा जुनी आहे. सुनील गावसकर यांचा चिरंजीव रोहन गावसकरने 18 वर्षांचा असताना बंगालतर्फे खेळण्याचा निर्णय घेतला. शिवाय, त्या राज्य संघातर्फे सर्वाधिक धावा जमवल्या. तसेच नेतृत्वही भूषवले होते. मोहम्मद अझरुद्दीनचा चिरंजीव मोहम्मद असदुद्दीनने 2018 च्या हंगामात काही रणजी सामने खेळले होते.

Related Stories

भारत-अर्जेंटिना महिला हॉकी सामना बरोबरीत

Patil_p

पाकच्या स्थानिक क्रिकेटपटूंच्या वेतनामध्ये वाढ

Patil_p

आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप आजपासून

Patil_p

महिला आयपीएलमध्ये 5 ते 6 संघ खेळवा

Patil_p

राजस्थानच्या विजयाला नोबॉल वादाचे गालबोट!

Patil_p

कोहली, इशांत, हार्दिक, अक्षरचे पुनरागमन

Patil_p
error: Content is protected !!