Tarun Bharat

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून गेहलोतांची माघार; निवडणूक लढणार नसल्याचं केलं स्पष्ट

ऑनलाईन टीम/तरुण भारत

काँग्रेस अध्यक्षपदाच्या (Congress President Election) निवडणुकीत आता नाट्यमय घडामोडी घडत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी सोनिया गांधींच्या (Soniya Gandhi) भेटीनंतर माफी मागत अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्षपदावरुन सुरु असलेल्या चर्चेमध्ये अशोक गहलोत यांनी आता हे स्पष्टीकरण दिल्यानं आता पुन्हा काँग्रेस अध्यक्ष कोण? हा प्रश्न समोर उपस्थित राहिला आहे. अशोक गेहलोत यांनी आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र ते काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल अशी चर्चा देखील रंगली होती.

अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. पुढे बोलताना ते म्हणाले, मी संपूर्ण मुद्दे आजच्या बैठकीत त्यांच्यासमोर ठेवले. मला मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे, असा संदेश संपूर्ण देशात असा गेला आहे की, मी सोनिया गांधींची माफी मागितली आहे, असंही ते म्हणाले.

हे ही वाचा : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार

गहलोत यांनी म्हटलं की, मी कोचीमध्ये राहुल गांधींना भेटलो आणि त्यांना काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याची विनंती केली. जेव्हा त्यांनी ते मान्य केले नाही, तेव्हा मी म्हणालो की मी लढेन पण आता त्या घटनेमुळे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं अशोक गहलोत यांनी म्हटलं आहे.

Related Stories

युवा आमदारांनी भाजप संस्कृतीवर डागली तोफ

Archana Banage

सुवर्णमंदिराला राष्ट्रपती मुर्मूंनी दिली भेट

Amit Kulkarni

अंडीफेक कोणत्या संस्कृतीत बसते?

datta jadhav

हिऱयांचा शोध… झाडांवर क्रोध

Patil_p

भारतात कोरोनाबळींची संख्या 50 हजारांवर

datta jadhav

झारखंडमध्ये भीषण रस्ते दुर्घटना, 15 ठार

Patil_p