Tarun Bharat

पहाटे उठून भूमिका जाहीर करणार नाही! जे तुमच्या मनात ते माझ्या; खा. संभाजीराजे छत्रपती

Advertisements

कोल्हापूर- ३ मे रोजी माझी राज्यसभेचा कालावधी संपेल. पण ३ मे नंतर माझी भूमिका जाहीर करणार म्हणजे, ४ तारखेला पहाटे उठून भूमिका जाहीर करणार असे नाही. मी काही लपवून ठेवणार नाही. कोल्हापूरकरांच्या मानत जी उत्सुकता आहे तीच माझ्या मनात आहे. ती लवकरच जाहीर करू, असे खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. ते कोल्हापुरातील शाहुमिल येथे बोलत होते. दरम्यान, कोल्हापुरातील शाहुमिल हे जिवंत स्मारक कसे करता येईल, यांचा प्रयत्न राज्यसरकार व केंद्रसरकारने करावा. असे देखील खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन केले होते. राज्यसरकारने मागणी मान्य केल्यानंतर हे आंदोलन स्थगित केले होते. मात्र अद्याप काही मागण्या मान्य झाल्या नसल्याने मराठा समाजाने पुन्हा मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. त्याबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांना विचारले असता, समाजाच्या भावना आहेत. पण मला या आंदोलनाबाबत कल्पना नाही, मी आताच दिल्लीवरून आलो आहे. त्याबाबत ठिय्या आंदोलन सुरु आहे हे कळले. माझ्या आंदोलनानंतर राज्य सरकारने ज्या तारखा दिल्या होत्या त्या तारखेत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यातील काही मागण्या मान्य झाल्या आहेत. पण जो शब्द दिला तो पूर्ण होताना दिसत नाही. मात्र आंदोलन कर्त्यांनी कायदा घेऊ नये. असे आवाहन केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा झाली आहे. ते उर्वरित मागण्याबाबत सकारातमक आहेत. पण ज्या गोष्टी कागदोपत्री झाल्या आहेत. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण झाल्या पाहिजेत. यातून मार्ग निघाला पाहिजे. सरकार म्हणून ह्या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजेत. उद्या कॅबिनेट बैठक झाल्यानंतर समनव्यक सोबत बैठक घेऊन चर्चा केली जाईल. काम पूर्ण करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. मी संभाजीराजे म्हणून पुढे जात नाही. समनव्यकांची भूमिका म्हणजे माजी भूमिका आणि समाजाची जी भूमिका ती समनव्यकांची भूमिका आहे. न्याय मिळवण्यासाठी माझा लढा आहे. अजित पवारांकडून खूप अपेक्षा आहे. ह्या गोष्टी कशा मार्गी लागाव्या याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. असे खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

यंदा राजर्षी शाहूंचे शताब्दी वर्षे आहे. शाहू जन्मस्थळाचे राहिलेली काम पूर्ण करावे. आज मी शाहूंच्या शाहुंची या ठिकाणी आहे. हे स्मारक जीवित कसे करता येईल हे पाहावे. हे काम फक्त राज्य सरकारचे नाही, केंद्रसरकारचे देखील आहे. मी राज्यसभेत देखील हा प्रश्न मांडला होता. त्यामुळे शाहूंची हि स्मारके जीवित करावेत. अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

Related Stories

खरीप काढणीत अडथळा,रब्बीच्या तयारीला ब्रेक

Archana Banage

एनडीएची 126 जागांवर आघाडी

datta jadhav

कधी ‘ती’ फसते तर कधी ‘तो’

Kalyani Amanagi

जनावरांच्या गोठय़ावर जावून सेवा द्या; गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांची सूचना

Archana Banage

खोट्या वजन काटा पावतीने ७ कोटींची फसवणूक; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Archana Banage

कोल्हापुरात शाहू टोलनाक्याजवळ ऑक्सिजन टँकर लिक

Rahul Gadkar
error: Content is protected !!