प्रतिनिधी /म्हापसा
म्हापशातील प्रसिद्ध जागृत देव बोडगेश्वराचा आज वर्धापनदिन असल्याने याचे औचित्य साधून श्री देव बोडगेश्वराला सोन्याचा दंड आज बुधवार दि. 4 रोजी सकाळी 9.30 वा. अर्पण करणार आहे. सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी केले आहे.
कोल्हापूर येथून सुमारे 70 लाख खर्चून देवासाठी खास सोन्याचा दंड बनवून आणण्यात आला असून तो विधीवत सकाळी 9.30 वा. देवाला अर्पण करण्यात येणार आहे अशी माहिती आनंद भाईडकर यांनी दिली.