Tarun Bharat

राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच मराठी पत्रकार परिषदे समवेत बैठक

प्रतिनिधी/ सातारा

राज्यातील पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न सोडवले जातील. त्यासाठी राज्यातील पत्रकारांची प्रबळ संघटना असलेल्या मराठी पत्रकार परिषदेसमवेत लवकरच बैठक आयोजित करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री व सातारा जिह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर येथे मुक्कामी आहेत. राजभवन येथे प्रथमच त्यांनी अधिकृत पत्रकार परिषद घेतली. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या सूचनेनुसार या पत्रकार परिषदेदरम्यान मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सातारा जिल्हा पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत. अनेक सरकारे आली आणि गेली पण पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही. मराठी पत्रकार परिषद ही एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लढणारी संघटना आहे. 36 जिल्हे व 350 तालुक्यात मराठी पत्रकार परिषदेच्या शाखा आहेत. पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील मराठी पत्रकार परिषदेच्या आमच्या राज्यस्तरीय शिष्ट मंडळाला मुंबईत वेळ मिळावी अशी आग्रही मागणी यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पत्रकारांनी मला खूप मदत केली आहे. त्यांचे प्रश्न नक्की सोडवू असे सांगत लवकरच मराठी पत्रकार परिषदेसंमवेत बैठक लावण्याच्या सूचना अधिकाऱयांना दिल्या.

राज्य व सातारा जिह्याचे प्रश्न सोडवताना तुम्हीही सूचना करत चला, त्याचा नक्की विचार करू असे ही मुख्यमंत्री म्हणाले .

निवेदन देताना मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे, महाबळेश्वर पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास काळे, सातारा शहर पत्रकार संघाचे खजिनदार राहुल तपासे, सोशल मीडिया सेलचे चंद्रसेन जाधव, वाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वास पवार, सातारा जिल्हा इले. मिडियाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव, सोशल मीडिया सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत जगताप, इम्तियाज मुजावर, नीलेश शिंदे, दिनकर थोरात, विलास काळे, प्रेषित गांधी, अभय हवालदार, अजित जाधव, केळगणे, संजय दस्तुरे यांच्यासह प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स, सेशल मीडियाचे पत्रकार उपस्थित होते.

Related Stories

सातारा : आनेवाडी टोलनाक्यावर फास्ट टॅगचा झोल, नागरिकांनी सुनावले खडे बोल

Archana Banage

Satara; पाचही आरोपी सापडले पण पिस्तुलचे काय ?

Abhijeet Khandekar

सज्जनगड भाविकांसाठी खुला

datta jadhav

शिवसेनेचे नाव, चिन्ह गोठवण्याचा भाजपचा हेतू

Patil_p

सातारा : ना ढोल, ताशा ना गुलाल फक्त शांतता….

Archana Banage

गावच्या विकासासाठी सक्षम लोकप्रतिनिधी निवडा

Patil_p