ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर राज्यातील राजकीय गोटात तीव्र हालचालींना वेग आला आहे. ४६ आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. यातच भाजप (BJP) आणि शिंदे गट मिळून सत्ता स्थापन करण्याचा डाव असल्याचे बोलले जात असताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक वेगळीच शंका उपस्थित केली आहे. “एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे का?” असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.


मंत्री शिंदे यांचा मविआ सरकराविरोधातील बंडाचा आज तिसरा दिवस आहे. मात्र अद्यापही एकनाथ शिंदेंकडून वेगळा पक्ष किंवा गट स्थापन करण्यावर निर्णय जाहीर केला नाही. तसेच भाजपसोबत जाण्याबाबतचा निर्णय देखील दिला नाही. त्यामुळे शिंदे शिवसेना सोडून वेगळा गट करुन भाजपला पाठिंबा देणार का? याबाबत संभ्रमावस्त आहे. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनीही सवाल उपस्थित केला आहे. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची अट एकनाथ शिंदे गटासमोर ठेवलीय का? असा सवाल वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.
हेही वाचा : बंडखोर आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले, बडव्यांनी तुम्हाला घेरलं…
एकनाथ शिंदे यांच्या गटासमोर भाजपने विलीनकरणाचा प्रस्ताव ठेवल्याचे म्हणत प्रकाश आंबेजकरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या ट्विटमुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने शिंदेंना घातली आहे का? असे ट्विट प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.