Tarun Bharat

केक में अंडा होगा क्या?

ही नागपूरमधील एक मनोरंजक कथा आहे. या शहरातील कपिल वासनिक नामक व्यक्तीने फूड डिलिव्हरी ऍपच्या माध्यमातून फॅमिली केकची ऑर्डर दिली होती. या केकमध्ये अंडे घातलेले आहे किंवा नाही? याची त्यांना माहिती हवी होती. यासाठी त्यांनी केकच्या विपेत्याला केकमध्ये अंडे आहे की नाही, असा प्रश्न व्हॉट्सऍपवरून विचारला आणि त्याचे उत्तर पाठविण्यास सांगितले.

केकच्या विपेत्यांनी स्विगीच्या माध्यमातून त्यांना केक पाठविला. त्यांनी पॅकिंग उघडून केक पाहिला असता केकवरच ‘कंटेन्स एग’ असे आयसिंग करून लिहिल्याचे त्यांना आढळून आले. हे पाहिल्यानंतर त्यांना हसू अनावर झाले. केकवाल्याकडून ही चूक झाली होती. त्याने अंडय़ात केक असल्याची माहिती वासनिक यांना वेगळा संदेश पाठवून देण्याची आवश्यकता होती. तथापि, केकवरच असा मजकूर केकच्या खरेदीदाराला हवा आहे, अशी त्याची समजूत झाल्याने त्याने केकवरच आयसिंग करून केकमध्ये अंडे असल्याची माहिती दिली होती. कपिल वासनिक यांनी स्वतःच हा गंमतीदार प्रसंग समाजमाध्यमांवरून व्हायरल करत केकचे छायाचित्रही त्याला जोडले आहे. केक मिळाल्यापासून अगदी गप्प आहोत, अशी टिप्पणीही त्यांनी त्यांच्या संदेशाखाली लिहिली आहे.

Advertisements

Related Stories

लोकसभा सभापती ओम बिर्लांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

केरळ : पायलटच्या सतर्कतेमुळे बचावले 104 प्रवाशी

datta jadhav

अंधांनाही सहजगत्या चालवता येणार संगणक

Patil_p

कोरोनातून वाचणार का ?…चाचणी देणार उत्तर

Patil_p

काश्मीरमध्ये हत्यासत्र सुरूच

Patil_p

सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी 8 अटकेत

Patil_p
error: Content is protected !!