वृत्तसंस्था/ ऑकलंड
न्यूझीलंडला आयसीसीच्या पहिल्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचे अजिंक्मयपद मिळवून देणाऱया कर्णधार केन विल्यम्सनने आपल्या कसोटी कर्णधारपदाचा त्याग केला आहे. सदर माहिती क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने गुरुवारी दिली. आता न्यूझीलंडच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी टीम साऊदीची नियुक्ती करण्यात येणार आहे.
केन विल्यम्सनने यापुढे वनडे आणि टी-20 प्रकारावर आपले लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे त्याने कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय न्यूझीलंड क्रिकेट मंडळाला कळविला आहे. पुढील वषी भारतात होणाऱया आयसीसीच्या विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेवर तसेच 2024 साली होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर आपण अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे विल्यम्सनने म्हटले आहे. 2016 पासून न्यूझीलंड संघाचे नेतृत्व विल्यम्सनकडे सोपविण्यात आले होते. तत्पूर्वी ब्रेन्डॉन मेकॉलम हा न्यूझीलंड कसोटी संघाचा कर्णधार होता. न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासामध्ये विल्यम्सन हा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडला 40 पैकी 22 सामने जिंकून दिले असून 8 सामने अनिर्णित राखले आहेत. तर 10 सामन्यात न्यूझीलंडला पराभव स्वीकारावा लागला. गेल्या वषीच्या जून महिन्यात आयसीसीच्या पहिल्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेत अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करून अजिंक्मयपद पटकाविले होते.
न्यूझीलंड कसोटी संघाचा नवा कर्णधार टीम साऊदीने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 346 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्याने 22 सामन्यात न्यूझीलंडच्या टी-20 संघाचे नेतृत्व केले आहे. आता न्यूझीलंडचा संघ पाकच्या दौऱयावर कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. या दौऱयात न्यूझीलंडचे नेतृत्व साऊदीकडे राहील. टीम साऊदी हा न्यूझीलंड कसोटी संघाचा 31 वा कर्णधार आहे.