वृत्तसंस्था/ लंडन
2022 च्या टेनिस हंगामातील येथे विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या हंगामातील ही तिसरी ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा आहे. अमेरिकेची माजी टॉप सीडेड सेरेना विल्यम्सला वाईल्डकार्डद्वारे महिला एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये प्रवेश देण्यात आला असून तिचा सलामीचा सामना फ्रान्सच्या हार्मोनी टॅन बरोबर होणार आहे.
सेरेनाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 23 ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. या स्पर्धेत सेरेनाला यावेळी सिडींग मिळालेले नाही. तब्बल वर्षां कालावधीनंतर तिचे टेनिस क्षेत्रात पुनरागमन होत आहे. सेरेनाने विंबल्डन स्पर्धा सातवेळा जिंकली असून तिने 2016 साली या स्पर्धेत आपले शेवटचे विजेतेपद मिळविले होते. 2018 आणि 2019 साली तिने या स्पर्धेत एकेरीची अंतिम फेरी गाठली होती. सेरेनाने 2017 साली ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील आपले शेवटचे जेतेपद मिळविले होते.