Tarun Bharat

फोंडा तालुक्याला वादळी वाऱयाचा तडाखा

निरंकाल, तळावली, बोरी, उसगांवात वृक्ष कोसळले; वीज पुरवठा ठप्प

प्रतिनिधी /फोंडा

एप्रिल महिन्यातील गुरूवारी उशिरा झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱयामुळे फोंडा तालुक्यात मोठय़ा प्रमाणात पडझड झाली. निरंकाल, बोरी, तळावली, माशेल, उसगांव, ढवळी फेंडा व इतर भागांना या वादळाचा तडाखा बसला. त्यात अनेक वृक्ष वीजवाहिन्यावर कोसळल्याने लाखो रुपयांची हानी झाली. फोंडा अग्निशामक दलात 8 व कुंडई येथे 1 ठिकाणी पडझडीच्या तक्रारी नोंद करण्यात आल्या. बऱयाचठिकाणी वीजखांब कोलमडून पडल्याने वीज प्रवाह खंडित झाला. अग्नीशामक दल व वीज खात्याचे कर्मचारी काल शुक्रवारी  दिवसभर मतदातकार्यात गुंतले होते.

माडापै माशेल येथे काजूचे झाड पार्क करून ठेवलेल्या दुचाकीवर कोसळल्याने दुचाकी हानी झाली. निरंकाल येथे गणनाथ देवळाजवळील कुभांरवाडा येथे माडाचे झाड वीज वाहिन्यावर कोसळल्याने या भागातील वीज पुरवठा ठप्प झाला. बोरी येथील साईबाबा मंदिराजवळ माडाचे झाड रस्तावर कोसळले. ओपा खांडेपार येथे आंब्याचे झाड वीज वाहिन्यावर, कुंभारभाट तळावली येथील अंतर्गत रस्त्यावार माडाचे झाड कोसळले तसेच गावणेकर घराजवळ एक आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. बोंडला रोड गांजे उसगांव येथे चिंचेचे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली. आगापूर येथे मारूती मंदिराजवळ फणसाचे झाड कोसळले. तसेच ढवळी येथे आंब्याच्या फांद्या रस्त्यावर पडल्या होत्या. फोंडा अग्निशामक दलाने तातडीने सेवा बजावत मदतकार्य केले. सुदैवानी कोणतीच जीवीतहानी झालेली नाही तसेच नुकसानीचा नेमका आकडा अजून स्पष्ट झालेला नाही. झाडे वीज वाहिनीवर कोसळल्य़ाने वीजपुरवठा खंडित झाला. खंडित झालेला वीज पुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु होते. कुंडई व फोंडा अग्निशामक दलातर्फे शुक्रवारी दिवसभर मदतकार्य सुरु होते.

 फोंडा अगिशामक दलाचे सुशील मोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष गावकर, देवीदास बायेकर, अवधूत नाईक, चंद्रशेखर मडकईकर, गणेश सांगोडकर, जितेंद्र भांडारी, योगेश वेलिंगकर, वामन गावडे, बाबी गावडे, बाबी पिळर्णकर, सदानंद कवळेकर यांनी सहकार्य केले. गुरूवारी उशिरा रात्री झालेल्या वादळामुळे फोंडय़ातील बऱयाच भागात मोठी नुकसानी झाली.

Related Stories

दाबोळी विमानतळासमोरील ग्रेड सॅपरेटर उड्डाण पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Omkar B

केरी तपासणी नाक्मयावर अडीच हजार जणांची तपासणी

Amit Kulkarni

सांगेपर्यंत पोहोचला कोरोना

Omkar B

बाणावली येथे ‘धिरयो’त रेडा ठार

Omkar B

वास्कोतील राजस्थान ग्रमीण मेळ्य़ाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

अ.भा.मराठी कवी संमेलनात रमेश वंसकर यांचा सहभाग

Amit Kulkarni