Tarun Bharat

विंडीजची डॉटिन ऍडलेड स्ट्रायकर्सशी करारबद्ध

Advertisements

वृत्तसंस्था/ ऍडलेड

ऑस्ट्रेलियातील महिलांच्या बिग बॅश लिग टी-20 2022 च्या हंगामासाठी मंगळवारी ऍडलेड स्ट्रायकर्स संघाने विंडीजची माजी अष्टपैलू महिला क्रिकेटपटू दियांद्रा डॉटीनशी नवा करार केला आहे.

विंडीजच्या अष्टपैलू डॉटीनने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 126 टी-20 सामन्यात तसेच 143 वनडे सामन्यात विंडीजचे प्रतिनिधीत्व केले आहे. टी-20 प्रकारात विंडीजची डॉटीन ही एक अनुभवी महिला क्रिकेटपटू म्हणून ओळखली जाते. महिलांच्या बिग बॅश लिग क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी आपण बऱयाच दिवसापासून वाट पहात होते. आता ऍडलेड स्ट्रायकर्स संघाने आपल्याला ही संधी निर्माण करून दिल्याबद्दल डॉटीनने या संघाचे आभार मानले आहे. 33 वर्षीय डॉटीनने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत टी-20 आणि वनडे क्रिकेट या क्रीडा प्रकारात किमान 250 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 2008 साली डॉटीनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विंडीज संघाकडून पदार्पण केले होते. तिने फलंदाजीत 6000 पेक्षा अधिक धावा तसेच गोलंदाजीत 134 बळी मिळविले आहेत. 2010 साली दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात डॉटीनने टी-20 प्रकारात 38 चेंडूत जलद शतक झळकविले होते. टी-20 प्रकारामध्ये जलद शतक नोंदवणारी डॉटीन ही पहिली महिला क्रिकेटपटू असून तिचा विक्रम अद्याप अबाधित राहिला आहे. द हंड्रेड या स्पर्धेत डॉटीनने लंडन स्पिरीट संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. इंडिया टी-20 चॅलेंज महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत तिने ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोव्हाज संघांना आपल्या कामगिरीच्या जोरावर विजेतेपद मिळवून दिले आहे.

Related Stories

केकेआरविरुद्ध लढतीत दिल्लीसमोर प्ले-ऑफचे लक्ष्य

Patil_p

ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम आजपासून

Patil_p

नेपाळमध्ये तिरंगी टी-20 मालिका

Patil_p

न्यूझीलंड संघात मॅट हेन्रीचा समावेश

Patil_p

यू-18 सॅफ फुटबॉल, भारताचा नेपाळवर विजय

Patil_p

भारतीय कसोटी संघाचा सराव सामना आजपासून

Patil_p
error: Content is protected !!