Tarun Bharat

वनडे मालिकेसाठी विंडीज संघाची घोषणा

Advertisements

वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱया तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी 14 जणांचा विंडीज संघ गुरुवारी जाहीर करण्यात आला. या संघामध्ये केव्हिन सिंक्लेअरला विंडीजच्या वरिष्ठ संघामध्ये प्रथमच संधी देण्यात आली आहे.

या मालिकेसाठी विंडीज संघाचे नेतृत्व निकोलास पुरनकडे सोपविण्यात आले असून शाय होप उपकर्णधार राहिल. या मालिकेतील हे सर्व म्हणजे तीन सामने दिवस रात्रीचे बार्बाडोसच्या किंग्जस्टन ओव्हल मैदानावर, 17, 19 आणि 21 ऑगस्ट रोजी होणार आहेत. 2023 साली भारतात होणाऱया आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत थेट प्रवेश मिळविण्यासाठी विंडीजचे प्रयत्न चालू आहेत. दरम्यान आयसीसी वनडे सुपर लिग स्पर्धेतील विंडीजचे हे तीन सामने बाकी आहेत. विंडीजचा संघ सुपर लिग युनायटेड वनडे मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. आयसीसीच्या आगामी वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वनडे सुपर लिग स्पर्धेतील भारत वगळता आघाडीच्या पहिल्या सात संघांना प्रवेश दिला जाईल. भारत या स्पर्धेचा यजमान असल्याने थेट प्रवेश मिळाला आहे. 

विंडीज निवड समितीच्या पॅनेलने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी नवोदित ऑफस्पिनर केव्हिन सिंक्लेअरची निवड केली आहे. सिंक्लेअरने गेल्या वर्षी लंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले असून त्याने आतापर्यंत 6 टी-20 सामन्यात विंडीजचे प्रतिनिधीत्व केले आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज गुडाकेश मोती यालाही या मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. मोतीला भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला ही मालिका सुरू होण्यापूर्वीच तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागेल. अष्टपैलू रॉस्टन चेस दुखापतीमुळे संघ निवडीसाठी उपलब्ध होऊ शकला नाही. विंडीजचा आणखी एक अष्टपैलू फॅबियन ऍलेन वैयक्तिक कारणामुळे या मालिकेत खेळणार नाही.

विंडीज संघ-निकोलास पूरन (कर्णधार), शाय होप (उपकर्णधार), ब्रूक्स, कार्टी, हेतमेयर, जेसॉन होल्डर, अकिल हुसेन, ए. जोसेफ, किंग, मेयर्स, गुडाकेश मोती, किमो पॉल, सिलेस आणि केव्हिन सिंक्लेअर.

Related Stories

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत थेंगवेलू भारताचा ध्वजधारक

Patil_p

चेन्नईचा प्रणव भारताचा 75 वा ग्रँडमास्टर

Patil_p

ऍटलेटिकोच्या दोन फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण

Patil_p

गुजरात जायंटस्मध्ये गेलचे आगमन

Patil_p

पाकचा बांगलादेशवर 8 गडय़ांनी दणदणीत विजय

Patil_p

अडीच कोटीचा फायदा, साडेसहा कोटींचा तोटा!

Patil_p
error: Content is protected !!