Tarun Bharat

Sangli; डोंगरसोनीत वाऱ्यामुळे पवनचक्कीचे पाते तुटले; सावळज परीसरात झाडे कोसळली; पथदिवेही पडले

Advertisements

सावळज / वार्ताहर

सावळज परीसरात गेली तीन दिवस जोरदार वारे वाहत आहे. या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडत आहेत. डोंगरसोनी येथे बुधवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पवनचक्कीचे पाते तुटून शेतात कोसळले. या पात्याचे तुकडे अनेकांच्या शेतात जाऊन पडले आहेत. तर काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडे व विज खांबावरील पथदिवे पडले आहेत.

गेली तीन दिवस झाले सावळजसह परीसरात जोरदार वारे वाहत असुन या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. डोंगरसोनी व कुंडलापुरच्या डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात पवनचक्की प्रकल्प उभारण्यात आले आहेत. मात्र बुधवारी रात्री जोरदार वाऱ्यामुळे डोंगरसोनी- तिसंगी रस्त्यालगतच्या पवनचक्कीचे तीन पात्यांपैकी एक पाते तुटून जमिनीवर कोसळले. जोरदार वाऱ्यामुळे या पात्याचे तुकडे होऊन दुरवर जावुन अनेकांच्या शेतात अस्ताव्यस्त पडले आहेत. रस्त्यालगतच पवनचक्की असल्याने रस्त्यावर ये-जा करणा-या प्रवाशांना धोका होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. तसेच जोरदार वाऱ्यामुळे सावळज-डोंगरसोनी रस्त्याकडेची काही झाडे कोसळून पडली आहेत. तर काही ठिकाणी वाऱ्यामुळे विद्युत पोल वरील पथदिवे खाली पडुन फुटले आहेत तसेच अनेकांच्या द्राक्ष बागेतील काड्याही मोडुन नुकसान झाले आहे. अनेकांच्या छपरावरील व घरावर टाकलेले प्लास्टिक कागद ही उडून गेले आहेत.

Related Stories

ह.भ.प बंडातात्या कराडकरांची मुक्तता करा – भाजपची मागणी

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

Abhijeet Shinde

विद्यापीठातील विविध पदांसाठी १४ नोव्हेंबरला निवडणूक

Abhijeet Shinde

सांगली : ‘कोव्हिड’ काळात मानसिक आरोग्य जपण्यासाठी ‘विश्वास’ हेल्पलाईन

Abhijeet Shinde

Sangli; इस्लामपुरात मशाल रॅलीने क्रांतिकारकांना आदरांजली

Abhijeet Khandekar

कोरोना इन्श्युरन्स करण्याच्या नावाखाली तरूणाला गंडा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!