लातूर : बुधवारी येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत भारताचे माजी दिवंगत आंतरराष्ट्रीय मल्ल हरिश्चंद्र बिराजदार यांचा मुलगा सागरने विजेतेपद पटकाविले. सागरने अंतिम लढतीत भरत कराडचा पराभव केला.
लातूर जिल्हय़ातील रामेश्वर ग्रामीण भागात झालेल्या राष्ट्रधर्म पुजक दादाराव कराड स्मृती महाराष्ट्र राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 86-125 किलो वजन गटातील लढतीत सागर बिराजदारने भरत कराडचा पराभव केला. या जेतेपदाबरोबरच सागरला 71 हजार रूपयांचे रोख बक्षीस आणि चांदीची गदा देण्यात आली. उपविजेत्या भरत कराडला 51 हजार रूपये तर तिसऱया क्रमांकावरील साताऱयाचा मल्ल राहुल सूळ याला 31 हजार रूपयांचे बक्षीस देण्यात आले.