बेळगाव : निना क्रिकेट अकादमी आयोजित व्हेनेडो चषक 13 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी सीसीआय संघाने निना क्रिकेट अकादमीचा 32 धावानी, युनियन जिमखानाने अर्जुन स्पोर्ट्चा 174 धावानी, आनंद अकादमीने रॉजर क्लबचा 10 गडय़ांनी, बेळगाव स्पोर्ट्स क्लबने एसकेईचा 4 गडय़ांनी, पराभव करून विजयी सलामी दिली.
युनियन जिमखाना मैदानावर आयोजित स्पर्धेच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून व्हेनेडो टीमोटी, ताहीर सराफ, सलीम सेलमवाले, मिलिंद चव्हाण, प्रशांत लायंदर, माजीद मकानदार व गणेश जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते. व्हेनेडो टीमोटी यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.