Winter Facial Home Remedies : थंडीला सुरुवात झाली की चेहरा कोरडा आणि काळा पडायला लागतो. ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांना या दिवसात खूपच त्रास होतो. आहार, व्यायामा सोबत या हिवळ्यात त्वचेची देखील तेवढीच काळजी घ्यावी लागते. यासाठी खूप महागड्या अशा प्रोडक्टच्या मागे न धावता घरच्या घरी तुम्ही काही टिप्स वापरून त्वचा तजेलेदार करू शकता. यासाठी खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. घरातील कमी सामग्रीत तुम्ही अतिशय चांगले फेशियल करू शकता ज्याचा तुम्हाला फायदा नक्की होईल. चला तर जाणून घेऊया कसे फेशियल तयार करावे आणि बनवावे.
स्टेप -1
स्क्रब करण्यासाठी
मसूरडाळ-1 चमचा
काॅफी पावडर- अर्धा चमचा
मध- अर्धा चमचा
गुलाबपाणी – एक चमचा
ऑलिफ ऑईल- एक चमचा
स्टेप-2
वाफ घेणे, ब्लॅक हेट्स, व्हाईट्स
स्टेप-3
मसाज क्रिम
अॅलोवेरा जेल-1 चमचा
ग्लिसरीन-1 चमचा
विटामिन ई कॅप्सूल -2
थोडीशी हळद
स्टेप-4
फेस पॅक
दही-2 चमचे
बेसनपीठ- दीड चमचे
पाव चमचा-हळद
बदाम तेल- छोटा चमचा
पुन्हा अर्धा छोटा चमचा हळद
स्टेप-5
माॅश्चराईझर
असे करा फेशियल
सुरुवातीला चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर स्टेप 1 मध्ये दिलेले साहित्य चांगले मिक्स करा. आणि हळूहळू चेहऱ्यावर लावा. चांगले स्क्रबिंग झाल्य़ावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या किंवा पुसून घ्या. यानंतर गरज असेल तर चेहऱ्याला वाफ घ्या .यानंतर ब्लॅकहेट्स काढून घ्या. आता स्टेप तिसरी करा. म्हणजेच चेहऱ्याला मसाज क्रिम लावून मसाज करून घ्या. यासाठी वर दिल्याप्रमाणे क्रिम तयार करून घ्या. चांगला मसाज झाल्यानंतर चेहरा पुसुन घ्या. यानंतर चेहऱ्याला फेसपॅक लावा. यासाठी स्टेप 4 मध्ये जे साहित्य दिले आहे तसा पॅक तयार करून घ्या. संपूर्ण चेहऱ्याला फेस पॅक लावल्यानंतर 10 मिनिटे पॅक तसाच ठेवा. यानंतर चेहरा स्वच्छ करून घ्या. चेहरा कोरडा केल्यानंतर तुम्हाला जे सुट होतेय ते माॅश्चराईझर लावा. असे करा घरच्या घरी फेशियल.


previous post