Tarun Bharat

हिवाळी अधिवेशन जानेवारी महिन्यात

सभापती रमेश तवडकर यांची माहिती

प्रतिनिधी /पणजी

जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱया आठवडय़ात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन होणार असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले. हे अधिवेशन कमी कालावधीचे असणार असून, सहा दिवसात आटोपते घेतले जाईल. येत्या आठ दिवसात अधिवेशनाची तारीख व कालावधी ठरविण्यात येणार असल्याचेही सभापती तवडकर यांनी सांगितले.

काल मंगळवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सभापती रमेश तवडकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत अन्य मान्यवर उपस्थित होते. काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या आठ आमदारांविरुद्ध सभापतीसमोर जी याचिका मांडण्यात आली आहे, त्याबाबत विचारले असता तवडकर म्हणाले की याचिकेवर आपण अभ्यास केला असून, येत्या आठ ते दहा दिवसात वादी आणि प्रतीवाद यांना नोटीस बाजवली जाणार आहे. याचिकेवर सुनावणी घेण्यास एवढा उशीर का झाला, असे विचारले असता, सुनावणी घेण्यास उशीर झालेला नाही, असे सांगून त्यांनी याचिका विषयावर अधिक बोलण्याचे टाळले.

Related Stories

पोलीस निरीक्षक संदेश चोडणकरांना निलंबित करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा

Omkar B

राज्य सहकारी बँक अध्यक्षांची हकालपट्टी करा

Amit Kulkarni

निदान मतदारसंघातिल खाण अवलंबिता वर मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे।

Patil_p

सांगेत आज आयआयटीसाठी महत्त्वपूर्ण बैठक

Patil_p

विठ्ठलापूर साखळीतील अपघातात पुन्हा “तेच” घर ठरले लक्ष्य

Amit Kulkarni

गोव्याच्या दोन विद्यार्थिनी भारतीय न्यायशास्त्र परंपरा परीक्षेत अव्वल

Omkar B