Tarun Bharat

हिवाळी अधिवेशन नव्या संसद भवनात

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम 10 दिवसात पूर्ण होणार : राजपथ देखील लवकरच होणार खुला

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीत निर्माण होत असलेल्या सेंट्रल व्हिस्टा ऍव्हेन्यूवर वेगाने काम सुरू आहे. या प्रकल्पात देशातील नवी संसद भवन आणि अनेक शासकीय इमारतींची निर्मिती करण्यात येत आहे. सेंट्रल व्हिस्टा ऍव्हेन्यूचे काम पुढील 10 दिवसांमध्ये पूर्ण होणार असल्याचे वृत्त आहे. हिवाळी अधिवेशनात नव्या संसद भवनात खासदारांचे स्वागत होणार आहे.

डिसेंबर 2020 पासून राजपथावर निर्मितीकार्य सुरू असल्याने तेथे कुणालाही जाण्याची अनुमती नव्हती. परंतु लवकरच इंडिया गेटपासून राष्ट्रपती भवनापर्यंतच्या सुमारे 4 किलोमीटरच्या मार्गाला खुले केले जाणार आहे.

सेंट्रल व्हिस्टा ऍव्हेन्यूचा मार्ग लवकरच खुला होणार आहे. राष्ट्रपती भवनासह इंडिया गेटचे सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठय़ा संख्येत पर्यटक दिल्लीत पोहोचत असतात, परंतु डिसेंबर 2020 मध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाल्यापासून हा मार्ग बंद होता. इंडिया गेट तसेच राष्ट्रपती भवनापर्यंतचा मार्ग लवकरच खुला होणार असल्याने सर्वसामान्य जनतेला या परिसरात पुन्हा हिंडता येणार आहे.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम एकूण 85.3 हेक्टरमध्ये सुरू आहे. यात अनेक प्रकारच्या विशेष सुविधांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात संसद भवनासह पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानाची देखील निर्मिती करण्यात येत आहे. 1.10 लाख चौरस मीटरमध्ये फैलावलेले पदपथ आणि त्याच्या चहुबाजूला हिरवाईने नटलेला परिसर, राजपथाला उजळवून टाकणारे 133 प्रकाशस्तंभ, 4,087 वृक्ष, 114 आधुनिक साइन बोर्ड आणि अनोखे उद्यान राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात विकसित होत असलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा हिस्सा असणार आहे.

Related Stories

कामकाज प्रक्षेपणासाठी राष्ट्रीय मंच स्थापणार

Amit Kulkarni

देशांतर्गत विमान वाहतूक आता 85 टक्के प्रवाशांसह

Patil_p

भारत-इस्रायल संरक्षण सहकार्य वाढविणार

Amit Kulkarni

एन.व्ही.रमण होणार नवे सरन्यायाधीश

Patil_p

संजदच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आरसीपी सिंह यांची वर्णी

Patil_p

गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष ठाम

Patil_p