नवी दिल्ली
ः एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी विप्रो कंझ्युमर केअर अँड लायटिंग यांनी आता पॅकेज फूड व्यवसायामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या एका वरि÷ अधिकाऱयाने या संदर्भातली माहिती नुकतीच दिली आहे.
स्नॅक पदार्थ, मसाले आणि तयार पदार्थांच्या बाजारामध्ये विप्रोला आपले पाय पसरायचे आहेत. या संदर्भातली तयारी कंपनीने पूर्ण केली आहे. विप्रो एंटरप्राइझेसचे रिषद प्रेमजी यांच्या नेतृत्वाखाली एफएमसीजी क्षेत्रामध्ये विप्रो कंझ्युमर जोमाने कार्य करत आहे.
अनिल छग यांच्याकडे कारभार
दरम्यान विप्रो कंझ्युमर केअर अँड लायटिंग व्यवसायाच्या मुख्यपदी अनिल छग यांची नेमणूक केली असल्याची माहिती प्रेमजी यांनी दिली असून पॅकेज फूड व्यवसायातही विप्रोला आगामी काळात आपला व्यवसाय वाढवायचा आहे. याआधी या व्यवसायात जम बसवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.