दोन्ही कंपन्यांमध्ये करार ः 5-जी उपकरण होणार तयार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारी विप्रो कंपनी आणि दूरसंचार उपकरण निर्मिती करणारी दूरसंचार कंपनी एचएफसीएल यांच्यात संयुक्तपणे 5-जी श्रेणीमधील उत्पादन तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे.
विप्रो आणि एचएफसीएल यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही कंपन्या दूरसंचार क्षेत्रातील 5-जी उत्पादनांची निर्मिती करणार असून एक दुसऱयाला सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये 5-जी रेडिओ पोहोचण्यासाठी नेटवर्क आणि 5-जी वहन उपकरणांचा समावेश होणार आहे.
व्यापक विस्ताराचा होणार लाभ
जागतिक पातळीवरील इंजिनिअर आणि त्यांचा अनुभव विप्रो व एचएफसीएल यांच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. तसेच आमच्या 5-जी वहन उपकरणांची व्यापक निर्मिती करण्यात येणार असल्याचा दावा एचएफसीएलचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र नाहटा यांनी केला आहे.