Tarun Bharat

भक्तीबरोबर बुद्धीही हवी

गुजरातच्या मंदिरात हत्तीच्या मूर्तीखाली अडकला भक्त

भारताला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. येथील अनेक राज्यांमध्ये हजारो नव्हे तर लाखो प्रार्थनास्थळे आहेत. या मंदिरांमध्ये जात देवाचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भक्तांच्या रांगा लागलेल्या असतात. काही भक्त तर देवावर असलेला भक्तीभाव अर्पण करण्यासाठी साष्टांग दंडवत घालत असतात.

गुजरातच्या एका मंदिरात मात्र वेगळाच प्रकार घडला आहे. येथे देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेला भक्त चक्क हत्तीच्या मूर्तीखाली अडकला अन् सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ही संपूर्ण घटना कॅमेऱयात कैद असून याचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून यात एक भक्त हत्तीच्या मूर्तीखाली अडकल्याचे दिसून येते. देवाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचलेला भक्त हत्तीच्या मूर्तीखाली अडकल्याने उपस्थित लोकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असल्याचे व्हिडिओत दिसून येते. मूर्तीखाली अडकल्यावर संबंधित भक्त स्वतःला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. तसेच मंदिरातील पंडितही त्याची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत होते. भक्ताला बाहेर काढण्यासाठी अनेक जणांशी सल्लामसलत केली जात असल्याचे व्हिडिओत दिसून येते.

हत्तीच्या मूर्तीखाली भक्त कसा अडकला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मंदिरात असलेले इतर भक्त अणि पंडित या व्यक्तीला सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. अखेर या भक्ताची या मूर्तीखालून सुटका झाली असली तरी ती नेमकी कशामुळे झाली हे समोर आलेले नाही.

Related Stories

पुणे : मंडई गणपतीची यंदा मंदिरातच प्रतिष्ठापना

Tousif Mujawar

चंदन उटी आणि मोगऱ्याच्या शेकडो फुलांनी सजला ‘श्री स्वामी समर्थ मठ’

Tousif Mujawar

पथदिपाखाली अभ्यास

Amit Kulkarni

आदिवासींमधील ‘लिव्ह इन रिलेशन’

Amit Kulkarni

77 वर्षीय इसमावर जडले 20 वर्षीय युवतीचे प्रेम

Patil_p

शिवजयंती शिवसंस्कारांची…

Tousif Mujawar