वार्ताहर /रामनगर
हल्याळ व जोयडा क्षेत्राचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांना नुकताच राज्यातील सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून घोषित करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून त्यांना नववर्षारंभी शुभेच्छा देण्यासाठी जोयडा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी हल्याळ येथे त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छांचा वर्षाव केला. जोयडा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सदानंद दबगार, ता. पं. माजी उपाध्यक्ष विजय पंडित, जि. पं. माजी सदस्य संजय हणबर, ग्रा.पं. सदस्य मारुती पाटील, जगलबेट मार्केटिंग सोसायटीचे अध्यक्ष गुरुनाथ कामत, जगलबेट ग्रा. पं. माजी अध्यक्ष सुहास देसाई, बळवंत देसाई, रामचंद्र माजाळकर, सुनील गावडे, रतन कलमणकर यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.