प्रतिनिधी / अकलूज
मागील भांडणाचा राग मनात धरून तू पोलीस केस मागे का घेत नाहीस असे म्हणत अकलूज पोलीस ठाण्यासमोर डोक्यावर कुऱहाडीने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना अकलूज पोलीस ठाण्यासमोरील चहा टपरी जवळ घडली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या हल्यामध्ये निखिल विश्वनाथ शिरसट (वय 26 रा. व्यंकट नगर अकलूज) हे जखमी झाले आहे. शिरसट त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकलूजमधील हिरा खंडागळे, नवनाथ साठे, रघुनाथ साठे, विजय खंडागळे, यशवंत ठोंबरे, यश खंडागळे, प्रदीप माने, दीपक साठे या आठजणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार दिनांक सतरा मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.
निखिल शिरसट हा पोलिस ठाण्यासमोर एक चहा टपरी जवळ आला असता पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून तसेच पोलीस केस मागे घे नाही म्हणून हिरा खंडागळे व अन्य लोकांनी आता आमचे ठरले आहे, तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कुऱहाडीने डोक्मयावर मानेवर वार करून जखमी केले असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगपात करित आहेत.