Tarun Bharat

मिलिंद नार्वेकर ठाकरेंसोबतच!

Advertisements


ऑनलाईन टीम/तरुण भारत

Milind Narvekar :एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर अनेकांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडली. आमदार-खासदार एकनाथ शिंदेंसोबत गेले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक व विश्वासू शिलेदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. गुलाबराव पाटलांनी याबाबत वक्तव्य केले होते. ही चर्चा सुरू असतानाच मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यावरून नार्वेकर हे ठाकरेंसोबतच असल्याचे स्पष्ट होत आहे.

काही वर्षांपूर्वी शिवसेना सचिवपदी नियुक्ती झालेले मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. संकट मोचक म्हणूनही त्यांची शिवसेनेत ओळख आहे. शिवसेनेतून बाहेर पडताना यापूर्वी अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भोवतीच्या नेत्यांवर गंभीर टीका केली होती. या सर्वांचं प्रमुख लक्ष नार्वेकर हेच होते. मात्र, उद्धव हे नेहमीच नार्वेकर यांच्या पाठीशी उभे राहिले. इतकंच नव्हे तर शिवसेनेत नार्वेकर यांचं महत्त्व वाढतच गेलं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांना तिरुपती देवस्थानाच्या सदस्यपदाची संधी दिली. तेच नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याचं बोललं जातंय. शिंदे गटाचे एक मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळं ही चर्चा रंगलीय. त्यावर नार्वेकर यांनी कुठलंही भाष्य केलेलं नसलं तरी त्यांनी केलेल्या एका ट्वीटमुळं सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाल्याचं बोललं जातंय.

नार्वेकर यांनी आज सकाळी हे ट्वीट केलं आहे. ‘५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू असून काल रात्री या कामाची पाहणी केली. तसंच, इथं असलेल्या बंगाल क्लबच्या दुर्गोत्सवास भेट दिली व माँ दुर्गेचं दर्शन घेतलं, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. सोबत त्यांनी शिवतीर्थावरील काही फोटोही शेअर केले आहेत. राजकीय तर्कवितर्कांना त्यांनी या ट्वीटमधून पूर्णविराम दिला आहे.

Related Stories

सातारचा पारा पोहचला 40 अंशांवर

Patil_p

किरण ठाकुर यांना खरी लोकमान्यता

Patil_p

आमदार संतोष बांगरांचा पीकविमा कार्यालयात राडा; अधिकाऱ्यांनाही केली शिवीगाळ

Archana Banage

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी लिझ ट्रूस यांची वर्णी; आदित्य ठाकरेंचं ट्वीट चर्चेत

Archana Banage

संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की, लोकशाहीत अशी घटना अयोग्य- नवाब मलिक

Archana Banage

उत्तर प्रदेशमध्ये डेल्टा नंतर आढळले कप्पा विषाणूचे रुग्ण!

Tousif Mujawar
error: Content is protected !!