Tarun Bharat

ज्येष्ट साहित्यिक रामचंद्राप्पा यांच्यावरील गुन्हा मागे घ्या

जिल्हाधिकाऱयांना विविध संघटनांचे निवेदन

प्रतिनिधी /बेळगाव

कर्नाटकातील ज्येष्ट साहित्यिक बरगुरु रामचंद्रप्पा यांच्या विरोधात पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला आहे तो तातडीने रद्द करावा. 40 वर्षांपूर्वी भरतनगरी पुस्तक लिहिले आहे. असे असताना आता काही संघटना त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करू लागले आहेत. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखलकेला आहे. तो तातडीने रद्द करावे, अशी मागणी जिल्हा प्रगती संघटना, शेतकरी संघटना व इतर संघटनांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भरतनगरी या पुस्तकासह अनेक पुस्तके या ज्येष्ट साहित्यिकांनी लिहिली आहेत. समाजातील वंचित घटकांवर त्यांनी अनेक कादंबऱया लिहिल्या आहेत. त्यांची वस्तुस्थिती त्यांनी मांडली आहे. ते एक उत्तम दर्जाचे साहित्यिक आहेत. मात्र या पुस्तकात त्यांनी अवमान केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काही संघटनांनी केली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही बाब अत्यंत चुकीची आहे. तेंव्हा दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन दिले. यावेळी डॉ. यल्लाप्पा हिमडी, मल्लेश कुरंगी, डॉ. सरजू काटकर, डॉ. डी. एस. चौगुले, डॉ. रामकृष्ण मराठे, एल. एस. नाईक, डॉ. सुजाता चलवादी, शिवलीला मिसाळे, सिद्धगौडा मोदगी, एम. आर. कलपत्री, रवी बस्तवाडकर, मारुती अक्कण्णावर, कृष्णा कांबळे यांच्यासह,  पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

मराठी टीचर्स टेनिंग कॉलेजतर्फे शिक्षक दिन

Amit Kulkarni

आज दिवसभर राहणार लॉकडाऊन

Patil_p

नेम्मदी केंद्राच्या अनागोंदी कारभाराने जनता त्रस्त

Amit Kulkarni

शुभम यादवला युनिव्हर्सिटी ब्ल्यू किताब

Amit Kulkarni

थकीत वेतन-काम देण्याची मागणी

Amit Kulkarni

नीना स्पोर्ट्स, टॅलेंट हुबळी, भटकळ स्पोर्ट्स क्लब संघ विजयी

Amit Kulkarni