Tarun Bharat

मनसे आमदार राजू पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारला सूचक इशारा; “कल्याणचा खासदार यापुढे…”

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राज्यात आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) युती होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना सूचक इशारा दिला आहे. आमदार राजू पाटलांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून आणि राज्यातील पालकमंत्र्यांच्या निवडीवरून हा इशारा दिला आहे.

कल्याणमधील अंबरनाथमध्ये मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमाला आमदार राजू पाटलांनी भेट दिली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्ही लोकसभा निवडणूक लढवणार नाही, हे आधीच स्पष्ट केलंय. परंतु मनसेच्या पाठिंब्याशिवाय कल्याणचा पुढील खासदार निवडून येणार नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला मोठा इशारा दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, “मी आमदारकीलाही उभं राहणार नव्हतो. मात्र, राज ठाकरेंनी म्हटल्यामुळेच मी उभं राहिलो. जर त्यांनी सांगितलं खासदारकीला उभा राहा, तर ती निवडणूकही लढवेन. पण एक गोष्ट निश्चित आहे, की यापुढे कल्याणचा खासदार जो कोणी खासदार होईल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला मनसेची मदत घ्यावीच लागेल. मनसेच्या मदतीशिवाय कल्याणमध्ये कोणीही खासदार होऊ शकणार नाही”, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

Related Stories

कोलकाता ते मुंबई न्यायमूर्तींचा तीन दिवस प्रवास

Archana Banage

शेतकर्‍यांच्या सर्वांगिण विकासासाठी ‘चिंचणेर पॅटर्न’ दिशादर्शक

Archana Banage

राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत सुशांत जेधेला रौप्यपदक

Patil_p

पथनाट्य़ातून कोरोना आणि ओमिक्रॉनबाबत जनजागृती

Abhijeet Khandekar

उत्तरप्रदेशात 31,277 शिक्षकांना मिळणार नियुक्तीपत्र

datta jadhav

हरकुळ-खुर्द येथील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह सापडला

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!