Tarun Bharat

अर्भकाचे अपहरण करणारी महिला 6 तासात गजाआड

Advertisements

अथणी पोलिसांची कामगिरी ः जिल्हा पोलीसप्रमुखांकडून कौतुक ः संशयित महिला म्हैशाळची

वार्ताहर/ अथणी

अथणी येथील सरकारी दवाखान्यामध्ये बुधवारी एका महिलेने नवजात अर्भकाला घेऊन पलायन केले होते. सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे पोलिसांनी अवघ्या सहा तासांमध्ये संशयित महिलेला गजाआड करून त्या अर्भकाला आपल्या मातेकडे स्वाधीन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी दिली. बेळगाव येथील पोलीस स्थानकात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मालाश्री उर्फ ऐश्वर्या कांबळे (रा. म्हैशाळ, ता. मिरज) असे त्या संशयित महिलेचे नाव आहे.

ऐनापूर येथील महिला अंबिका भोई यांना बाळंतपणासाठी अथणीच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. सकाळी अकरा वाजता ती महिला बाळंत झाल्यानंतर तिला मुलगा झाला. त्यानंतर एक अपरिचित नर्स त्या मुलाला वजन करण्यासाठी घेऊन जाते म्हणून सांगून त्या अर्भकास घेवून गेली. ती नर्स तब्बल अर्धा तास होवूनही परत न आल्याने त्या मातेने आरडाओरड केला. लागलीच तिचे पती अमित भोई यांनी अथणी पोलीस स्टेशनला माहिती देताच अथणी पोलिसांनी अवघ्या केवळ 6 तासांमध्ये तिला म्हैशाळ येथे पकडले.

अथणी पोलिसांनी चांगली कामगिरी केल्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील आणि कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार यांच्याकडून 20 हजार रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली.   यावेळी डीएसपी विश्वनाथ जलदे, सीपीआय रवींद्र नायकवडी, पीएसआय शंकर मुखर्जी, प्रवीण कुमार आदी उपस्थित होते.

Related Stories

म. ए. समितीच्या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहाभागी होण्याचा येळ्ळूर वासियांचा निर्धार

Nilkanth Sonar

हिंदवाडी महिला मंडळातर्फे कोरोना योद्धय़ांचा सत्कार

Amit Kulkarni

कडोलीतील रोहयो भ्रष्टाचारात आणखी एका प्रकरणाची भर

Omkar B

जलानिधी योजनेंतर्गत नळ जोडणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Patil_p

रताळी दर वधारला, कांदा दरात घसरण

Patil_p

सिव्हिल हॉस्पिटलमधील कारभार सुधारणे गरजेचे

Amit Kulkarni
error: Content is protected !!