Mumbai News: मुंबई- मुंबादेवी परिसरात दोन दिवसापूर्वी मनसे कार्यकर्त्यांकडून मंडप उभा केला जात होता. गणपती मंडप उभा करण्याच्या वादातून महिलेला मारहाण करण्यात आली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मारहाण करणारा मनसे उपविभाग प्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचं नाव विनोद आरगीले असं आहे. बांबू लावण्याचा प्रयत्न होता. राज ठाकरे यांना आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यामुळे हातून अशी घटना घडल्याचे विनोद आरगीले यांनी म्हटलं आहे. या घटनेनंतर राज ठाकरे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे ‘मनसे’ला हे पटतं का असा प्रश्न विचारला जात आहे.
मारहाण झालेल्या महिलेने रितसर पोलिस स्टेनमध्ये तक्रार नोंद केली आहे. परंतु अजून कोणतीही कारवाई पोलीसांनी केली नाही. मात्र सध्या गणेशोत्सव सुरु आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर यावर कारवाई होईल अशी माहिती पोलिसांनी सांगितल्याचे समोर आले आहे.
या घटनेनंतर विनोद आरगीले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, महिलेचा आदर केला पाहिजे. त्या महिलेने गैरवर्तणूक केली. मी बचावासाठी रागाच्या भरात हे कृत्य केले. माझ्याकडून चूक झाल्याचे मला मान्य आहे. त्याबाबत जाहीर माफी मागायला मी तयार आहे. मात्र त्या महिलेने चूक करण्यास प्रवृत्त का केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना ते म्हणाले, त्या महिलेला सगळे लोक त्रासलेले आहेत. हे एक षडयंत्र आहे. त्या महिले विरोधात मनपा कार्यालयात तक्रार केली असल्याचे विनोद आरगीले यांनी सांगितले.

