धामोड/ वार्ताहर
धामोडपैकी नऊ नंबर धरणग्रस्त वसाहत ( ता. राधानगरी ) येथील मंगल मल्लापा शिंदे ( वय – ४०) या महिलेच्या गळ्यातील स्कार्फ गिरणीच्या पट्ट्यामध्ये अडकून तिचा मृत्यू झाला. हि घटना मंगळवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतची अधिक माहीती अशी की, मंगल शिंदे या स्वत:च्या पिठाच्या गिरणीत दळण दळत असताना त्यांचा स्कार्फ नकळतपणे गिरणीच्या पट्ट्यामध्ये अडकला व गळ्याभोवती फास आवळला. दरम्यान, हा प्रकार मंगल यांच्या जाऊच्या लक्षात आला. तिने आरडाओरड करत तात्काळ धाव घेत स्वीच बंद करुन त्यांना बाजुला केले. दरम्यान ग्रामस्थांची गर्दी जमली. यावेळी मंगल या पुर्ण बेशुध्द झाल्या होत्या. घरातील मंडळी व ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ कोल्हापुर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले परंतु तत्पुर्वीच त्यांचा मृत्यु झाला असलेचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबतची नोंद सी.पी.आर. पोलिस चौकी कोल्हापुर येथे झाली आहे. जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर सदर महिलेचा मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.