Tarun Bharat

चिपळुणातील दोन अपघातात महिला ठार, ४ जखमी

आगवे, कळवंडे येथील घटना : जखमीत जिल्हा रूग्णालयाच्या मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. समीक्षा जाधव यांचा समावेश

प्रतिनिधी/चिपळूण

मुंबई-गोवा महामार्गावर आगवे व कळंवडे बौध्दवाडी येथे गुरूवारी झालेल्या दोन विविध अपघातात महिला ठार, तर 4 जण जखमी झाले आहेत. जखमीमध्ये जिल्हा रूग्णालयाच्या मानसोपचार तज्ञ डाॅ. समीक्षा जाधव यांचा समावेश आहे.

ठार झालेल्या महिलेचे आशा रवींद्र वरपे (45, कळवंडे-वरपेवाडी) असे नाव असून जखमींची डॉ. समीक्षा जाधव, रवींद्र नारायण वरपे अशी नावे आहेत. अन्य दोन जखमींची नावे उपलब्ध झाली नाहीत. डाॅ. जाधव या गुरूवारी चिपळुणातील शिबिरासाठी पतीसह कारने येथे येत होत्या. त्या आगवे येथे आल्या असता त्यांची कार व दुचाकी यांच्यात अपघात झाला. त्यामुळे कार 60 फूट दरीत कोसळली. यात जाधव या गंभीर जखमी झाल्या असून पती व दुचाकीस्वारही जखमी झाले आहेत.

हे ही वाचा : चिपळूणमधील भाजी मंडई परिसरातील अतिक्रमण अखेर जमीनदोस्त

तसेच कळवंडे येथे गुरूवारी दुपारी 1.15 वाजता रिक्षा व कार यांच्यात झालेल्या अपघातात आशा वरपे या ठार झाल्या. पती रवींद्र वरपे जखमी झाले. या दोन्ही अपघातांच्या पोलीस स्थानकात नोंदी करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.

Related Stories

Ratnagiri : पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ राजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा

Abhijeet Khandekar

जिल्हय़ात ‘अत्यावश्यक’लाही टाळे!

Patil_p

कोरोना लसीकरणाला पुन्हा ब्रेक

Patil_p

चिपळूण शहरात दोन दिवसात 1366 कुंटुबांचे सर्वेक्षण

Patil_p

कोकण रेल्वेकडून शेतकऱयांसाठी दिलासादायक कामगिरी

Patil_p

रिकामा डय़ुरा सिलेंडर जोडला अन् 50 रुग्ण झाले अस्वस्थ

Patil_p